सोमय्यांच्या आरोपानंतर महापौरांनी सोडले मौन; म्हणाल्या आरोप सिद्ध करा शिक्षा भोगेन

तुषार सोनवणे
Saturday, 12 September 2020

भाजपनेते किरीट सोमय्या यांनी एसआरए योजनेत फ्लॅट आणि ऑफिस लाटल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर केला आहे.

मुंबई - मुंबई महानगरपालिकेने अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर कारवाई केल्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेवर कडाडून टीका केली जात आहे. म्हाडाने वर्षभरापूर्वी मंत्री अनिल परब यांना नोटीस पाठवली होती. त्यावरही भाजपने सडकून टीका केली आहे. असं असताना भाजपने आता महापौर किशोरी पेडणेकर यांना आपले लक्ष केले आहे. भाजपनेते किरीट सोमय्या यांनी एसआरए योजनेत फ्लॅट आणि ऑफिस लाटल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर केला आहे.

सोमवारी वडाळा आगारात बेस्ट कर्मचारी करणार आंदोलन, जाणून घ्या आंदोलना मागचं कारण

भाजपनेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर महापौर पेडणेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, त्यांनी माझ्यावरील आऱोप सिद्ध करावेत, आरोप सिद्ध झाले तर मी शिक्षा भोगेन. खरं तर बेताल वक्तव्यांमुळे किरीट सोमय्यांची खासदारकी गेली आहे. मुळात ते म्हणताय त्यात तथ्य नाही. मी सोमय्यांना खुलं आव्हान करू इच्छिते की, 2008 मध्ये तिथे भाड्याने राहत होते. दरवर्षी मालकाला त्याचे रितसर भाडे दिले जाते. त्याचे पुरावे आहेत. किश कॉर्पोरेटचं ऑफिसदेखील भाडेतत्वावर घेतले आहे. त्याचेही सगळे पुरावे आहेत.त्यामुळे ते लाटन्याचा प्रश्न येतो कुठे? माझं घर असलेली चाळ अजून विकसित होत आहे, त्याचा ताबा मिळेल तेव्हा तेथे राहता येईल, तोपर्यंत आम्ही भाड्याने राहतोय. सोमय्या माझ्यावर खोटे आरोप करीत आहेत.

दरम्यान, महापौरांनी पदावरून पायउतार व्हावं, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांंनी म्हटले आहे की, किश कॉर्पोरेटचे ऑफिस एसआरएचे आहे. एसआरए सध्या मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. महापौर असताना फ्लॅट आणि ऑफिस लाटण्याचे प्रकार केले आहे, त्यावरुन किशोरी पेडणेकर यांनी पदावरुन पायउतार व्हावं. 

येत्या दोन दिवसात कसा असेल मुंबईत पाऊस जाणून घ्या अपडेट्स

दरम्यान, सोमय्या यांनी महापौर भाड्याने राहत आहेत या मुद्यारही त्यांना घेरले, ते म्हणतात की,  महापौर सांगतात की, त्या भाड्याने राहतात, पण एसआरएच्या नियमानुसार असं भाड्याने राहता येतं का? निवडणूक प्रतिज्ञापत्रात किशोरी पेडणेकर यांनी घरचा पत्ता म्हणून एसआरए सोसायटीमधील फ्लॅटचा पत्ता दाखवला आहे. किश कॉर्पोरेटचं रजिस्ट्रेशन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे, त्याच संचालक होत्या. अशाप्रकारे गरिबांची संपत्ती लुटत असेल तर निश्चितपणे सगळ्यांसमोर ठेवणार. असाही इशार सोमय्या यांनी दिला आहे

----------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kirit Somaiya criticizes Mayor Kishori Pednekar