किसान मोर्चाची "पोलखोल' यात्रा! राज्यात 6 ते 20जानेवारी दरम्यान शेतकरी संघटनांचे आंदोलन

सकाळ न्युज नेटवर्क
Monday, 4 January 2021

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला बळ देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने येत्या 6 ते 20 जानेवारी दरम्यान देशभर "पोलखोल' पंधरवडा राबण्याचे निश्‍चित केले आहे.

मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला बळ देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने येत्या 6 ते 20 जानेवारी दरम्यान देशभर "पोलखोल' पंधरवडा राबण्याचे निश्‍चित केले आहे. राज्यातदेखील हा पंधरवडा राबवण्यात येणार असून त्यासाठी नांदेड येथून यात्रा सुरू करण्यात येणारआहे. 

गेल्या 40 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर केंद्रातील मोदी सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन सूरू आहे. आजपर्यंत चर्चेच्या सात फेऱ्या पार पडल्या; मात्र अद्याप शेतकरी आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी आंदोलन तीव्र व देशव्यापी करण्याचा निणर्य घेतला आहे. महाराष्ट्रातील हजारो शेतकरी दिल्लीतील शेतकरी आंदोलन सहभागी आहेत. सोमवारी (ता.4) शेतकरी नेते व केंद्र सरकार यांच्यात वाटाघाटीची आठवी फेरी आहे. ती अयशस्वी झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलन देशात तीव्र होत असून आंदोलकांनी प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत ट्रॅक्‍टर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. संयुक्त किसान मोर्चाचे संदीप आबा गिड्डे-पाटील, नाशिकचे इंजी शंकर दरेकर, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मजदूर महासंघ, अमरावतीचे राष्ट्रीय किसान महासंघाचे संयोजक श्रीकांत तराळ, लातूर येथील शेतकरी नेते लक्ष्मण वंगे, नाशिकचे संघोर्ष शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, जळगाव येथील किसान क्रांतीचे एस. बी. नाना पाटील, अहमदनगर येथील राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे अरूण कान्होरे, किसान क्रांतीचे योगेश रायते हे राज्यातील पोलखोल यात्रेचे नियोजन करत आहेत. 

...तर राज्याला फायदा 
पंजाबमध्ये 80 टक्के अन्नधान्य किमान आधारभूत किंमतीने खरेदी होते. महाराष्ट्रात हे प्रमाण 5 टक्के आहे. किमान आधारभूत किंमतीचा कायदा झाल्यास राज्यात हे प्रमाण 60 टक्‍क्‍यांपर्यंत जाईल, असा दावा किसान मोर्चाचे संदिप आबा गिड्डे यांनी केला आहे. 

Kisan Morchas Polkho Yatra Movement of farmers organizations in the state from 6th to 20th January

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kisan Morchas Polkho Yatra Movement of farmers organizations in the state from 6th to 20th January