
Mumbai : महापौर पेडणेकर दिशा सालियानच्या घरी
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushantsingh Rajput) आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान (Disha Salia) यांचे मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिले. दरम्यान, त्या आज थेट दिशा सालियानच्या घरी पोहोचल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत महिला आयोगाच्या सदस्य देखील त्यांच्यासोबत होत्या. (Kishori Pednekar at Disha Salian Home)
हेही वाचा: "2024 साठीचा दिल्लीचा रस्ता महाराष्ट्रातून जाईल"
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियान यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत भाष्य केलं होतं. यामुळं आता नारायण राणे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याविरोधात याबाबत राज्य महिला आयोगाकडं तक्रार नोंदवण्यात आली आहे. याची दखल घेत आयोगानं मालवणी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा: इयत्ता आठवी ते बारावीच्या मुलींसाठी सायकल वाटपाच्या अनुदानात वाढ
Web Title: Kishori Pednekar At Disha Salian Home Sushantsingh Rajput Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..