
हो.. तो कागद मी गिळला, किशोरी पेडणेकरांची भर कार्यक्रमात कबुली
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर त्यांच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात.राणीच्या बागेतील पेंग्विंन्सला चंपा आणि चिवा असं नाव देण्याचं त्यांचं वक्तव्य असेल. किंवा राज ठाकरेंच्या भाषणावर दिलेली प्रतिक्रिया असेल!
किशोरी पेडणेकर थेट निशाणा साधतात. तुंबलेल्या मोरीतून गांडूळ बाहेर पडल्याचं त्यांनी नुकतंच म्हटलं होतं. यानंतर पुन्हा त्या चर्चेत आल्या. मात्र, आता त्यांनी एक कागद गिळल्याचं सांगितलं. एका मराठी टेलिव्हिजन शोमध्ये त्यांनी हा किस्सा सांगितल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा: 'तुंबलेल्या मोरीतून काहीतर निघेल वाटलं, पण हे तर भाजपचं...'
पेडणेकरांना सरप्राइज
एका मराठी चॅनेलवरील कार्यक्रमाला किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावली. शो होस्ट करणाऱ्या संकर्षण कऱ्हाडेने किशोरीताईंसाठी सरप्राइज प्लॅन केल्याचं सांगितलं. हे बोलताच किशोरीताईंचे पती त्या ठिकाणी मंचावर येतात. हे पाहून किशोरी पेडणेकरांनाआ नंद होतो.
यानंतर किशोरी ताई म्हणतात की, प्रेमविवाहाची सुरुवातीची वर्ष आणि त्यानंतरची काही वर्ष म्हणजे माझं हे मोठं सरप्राईज! असं म्हणत त्यांनी प्रेमप्रकरणाचा किस्सा सांगितला.
हेही वाचा: Video : किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ, रूपाली पाटिल विकणार भाजी
'भावांना दिसू नये म्हणून कागद उचलून तोंडात टाकला'
एकदा घरात पिठ मळत असताना आमच्या दोघांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या मित्राने एक चिठ्ठी आणली. कोणाला कळू नये म्हणून चोरून आणली होती. पण देता-देता ती खाली पडली. आणि माझे सगळे भाऊ समोर बसले होते. त्यातल्या एकाने हे पाहिलं. मित्र मला काहीतरी देत आहे हे एका भावाने पाहिलं. तो मला विचारायला येणार, इतक्यात मी ती चिठ्ठी खाऊन टाकली!
किशोरी पेडणेकरांच्या या लव्हलेटरच्या किस्स्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायलर होतोय. हा धमाल किस्सा किशोरी पेडणेकर यांनी झी मराठीच्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात सांगितला आहे.
Web Title: Kishori Pednekar Explains Her Letter Story In Kitchen Kallakar Programe
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..