मी गेल्यावर सगळ्यांनाच उलट्या सुरू झाल्या - किशोरी पेडणेकर

kishori pednekar
kishori pednekarTeam eSakal
Updated on

मुक्या पक्षी प्राण्यांवर राजकारण करून मुंबईला अस्थिर करणं आम्हाला मान्य नाही, अस म्हणत महापौर किशोरी पेडणेकरांनी भाजपला टोला लगावला आहे. पक्षी प्राणी ज्या तापमानात राहतात, त्यावर बोलून राजकारण करून मुंबईला बदनाम करणं मला आवडत नाही. पण मी तेथे गेल्यावर सगळ्यांना उलट्या सुरू झाल्या. मी कोणाचीही तुलना केली नव्हती. पण त्या करण्याआधीच ओकाऱ्या सुरू झाल्या, असं त्यांनी सांगितलं. महापौर पेडणेकरांनी गुजरातच्या सायन्स सेंटरची पाहाणी केली. यावेळी त्यांनी गुजरातमधील पेग्वीन प्रकरणात भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला. (Kishori Pednekar visited science center of gujrat)

किशोरी पेडणेकरांनी गुजराती महिलांची भेट घेतली. यावेळी गुजराती समाजातील अनेक बांधव उपस्थित होते. पक्षांवर प्राण्यांवर न बोलण्याच ठरवलं होत. पण भातखळकर, शेलार, राणे सुपुत्र यांनी आदित्य साहेबांना हिणवायला सुरुवात केली. मग आम्ही म्हणायचं का? आशिष शेलार गुजरात पेंग्विन , भातखळकर गुजरात पेंग्विन! ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांना चांगलं म्हणूया, यात राजकारण कशासाठी करता? असा प्रश्न पेडणेकरांनी केला.

चिवा आणि चंपा!

चिवा ताई मला पेंग्विनकर म्हणून मला बोलवतात. पण आम्ही सिद्ध केलंय की पेंग्विन मुंबईकर झाले आहेत. मला निष्पाप पेंग्विनंच नाव दिलेलं आवडलंय. कारण जे चांगलं देता येईल ते मुंबईकरांना आम्ही देऊ, असा टोला पेडणेकर यांनी लगावला आहे. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही म्हणतात. मग अटलबिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन यांची तरी भाजपा राहिली का? असा सवाल किशोरी पेडणेकरांनी उपस्थित केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com