चाकू हल्ला प्रकरण; स्वतःवर गोळी झाडणाऱ्या पतीकडे पिस्तुल आले कुठून?

सोमनाथ हा पत्नी वंदना हिच्या चारित्र्यावर संशय घेत चोरीचा आरोप करीत असे
आत्महत्या करण्याचा प्रयत्न
आत्महत्या करण्याचा प्रयत्नsakal

डोंबिवली: घरगुती वादातून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास निघालेल्या पत्नीवर पतीनेच भर रस्त्यात दुपारी चाकूने वार करुन तिला गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी डोंबिवली पूर्वेत घडली होती. या प्रकरणातील आरोपी सोमनाथ देवकर याचा रामनगर पोलिस शोध घेत असतानाच रविवारी सकाळी त्याने रहात्या घरी स्वतःवर पिस्तुलने गोळी झाडून घेतल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमनाथ याने हे पिस्तुल कशासाठी आणले, कोठून आणले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आत्महत्या करण्याचा प्रयत्न
पालीत एकाच रात्रीत चार ठिकाणी चोऱ्या

डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर परिसरात राहणाऱ्या वंदना यांचा सोमनाथ याच्याशी 8 वर्षापूर्वी विवाह झाला आहे. सोमनाथ हा पत्नी वंदना हिच्या चारित्र्यावर संशय घेत चोरीचा आरोप करीत असे. यावरुन त्यांच्यात वारंवार वाद होत होते. मंगळवारी दुपारी देखील वाद झाल्याने रागाच्या भरात वंदना या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास निघाल्या होत्या. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या सोमनाथने त्यांच्यावर चाकूने वार करीत गंभीर जखमी करत पळ काढला होता. रिक्षाचालकाने प्रसंगावधान राखीत वंदना यांना शास्त्रीनगर रुग्णालयात हलविले. तेथून त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी वंदना यांच्या तक्रारीवरुन सोमनाथ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते.

आत्महत्या करण्याचा प्रयत्न
अर्थसंकल्पात महाराष्ट्राला अपुरा निधी दिल्याबद्दल नाराजी

रविवारी सकाळी 10 च्या सुमारास सोमनाथ रहात्या घरी आला. घराला लावलेले कुलूप तोडून तो घरात शिरला व त्यानंतर बंदुकीने गोळी मारुन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी सोमनाथ याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सोमनाथ याने हे पिस्तुल मध्यप्रदेश येथून आणले असून त्याच पिस्तुलने त्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा प्रयत्न केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com