सख्या भावाचा खून करून मृतदेह भरला गोणीत; अवघ्या काही तासात पोलिसांनी लावला छडा

नरेश जाधव
Tuesday, 12 January 2021

भाऊ दमडीही न कमवता बसून खातो, मारण्याची धमकी देतो, पैसे मागतो व घरात त्रास देतो म्हणून त्याच्या सख्या मोठ्या भावाने व आईने त्याचा धारदार शस्त्राने खून केला. 

खर्डी - भाऊ दमडीही न कमवता बसून खातो, मारण्याची धमकी देतो, पैसे मागतो व घरात त्रास देतो म्हणून त्याच्या सख्या मोठ्या भावाने व आईने त्याचा धारदार शस्त्राने खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह कसारा घाटात आणून टाकल्याची धक्कादायक घटना गुन्हे पोलिसांनी अवघ्या काही तासात उघड़कीस आणली.

पोटच्या मुलाचा खून आई आणि दोन भावंडांनी केला असल्याची आई व मुलांच्या नात्याला काळीमा लावणारी घटना घडली आहे.सतीष रामदास आगळे (23) राहणार ठाणे असे मृत भावाचे नाव असून यप्रकरणी मोठा भाऊ शिवाजी रामदास आगळे,आई माया बाई व अमृता बिरारे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आल्यावर 15 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी सूनावण्यात आली आहे.  

मुंबई, ठाणे, भिवंडी परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

ठाणे चिरागनगर येथे राहणारा सतिष रोज कुटुंबातील सदस्यांना त्रास देत असे,त्याच्या त्रासाला कंटाळून कुटुंबातील आई, मोठा भाऊ आणि मावस भाऊ यांनी सतिषचा धारदार शस्राने हत्या करून जीव घेतला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोणीत भरून वहानाने कसारा घाटात आणून फेकला. त्यानंतर आपलं क्रूरकृत्य लपवण्याकरिता आरोपींनी सतीशचे क्रियाकर्म करण्यासाठी खोटा बनाव करून माझ्या मुलाचे कपडे आणि मृतदेह कसारा घाटात असल्याचा निनावी फोन आल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी घाटात तपास घेतला असता मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटातील रस्त्याच्याकडेला गोणीत दुर्दैवी सतीशचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. मात्र सतिषच्या शोधात आलेल्या तिघाई संशयित नातेवाईकांची चौकशी केली असता त्यांच्या हावभावर संशय आल्याने सखोल चौकशी केली. त्यांनीच त्याची हत्या केली असल्याचे निष्पन्न झाले.

knocked off by brother in Bhivandi police find accused in few hour

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: knocked off by brother in Bhivandi police find accused in few hour

टॉपिकस
Topic Tags: