esakal | तुम्हाला नवीन कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनबद्दल माहिती आहे का? जाणून घ्या A टू Z माहिती 
sakal

बोलून बातमी शोधा

तुम्हाला नवीन कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनबद्दल माहिती आहे का? जाणून घ्या A टू Z माहिती 

नव्या स्ट्रेनचा संसर्ग 70 टक्के अधिक पसरु शकतो, कोविड 19 टास्क फोर्सच्या सदस्यांचे मत

तुम्हाला नवीन कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनबद्दल माहिती आहे का? जाणून घ्या A टू Z माहिती 

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई, 24 : नवीन कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनबाबतची माहिती सर्वांना माहित असणे गरजेचे असून या सार्स कोविड 2 चे नवीन रूप जुन्या प्रकारापेक्षा 70% अधिक संक्रमणीय होऊ शकते. त्यातही चिंतेची बाब अशी, ती म्हणजे या स्ट्रेनमुळे 30-60 वयोगटातील लोकांना अधिक धोका आहे, असे काही अहवालातून समोर आले असल्याचे कोविड 19 टास्क फोर्सच्या सदस्यांचे मत आहे.

जेव्हा सर्व कोविड 19 साठी येणाऱ्या लसीबद्दलची अपेक्षा व्यक्त करत होते, तेव्हा इंग्लंड सरकारने जाहीर केले की त्यांना इंग्लंडमध्ये कोरोनाव्हायरसचा अजून एक अत्यंत संसर्गजन्य नवीन प्रकार आढळला. लंडन आणि आसपासच्या भागात व्हायरसचा वेगवान प्रसार होत असल्याचे कारण देत पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी लॉकडाउन केले आहे.

मात्र, तिथल्या शास्त्रज्ञांना या रूपाबद्दल चिंता आहे पण, आश्चर्य नाही. कारण, सर्व विषाणूंप्रमाणेच कोरोनाव्हायरसही एक शेपशिफ्टर व्हायरस आहे. ज्यात काही अनुवांशिक बदल होत असतात. कोरोनाव्हायरसच्या जगभरात आढळलेल्या हजारो छोट्या छोट्या बदलांची संशोधकांनी नोंद केली आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की हा व्हायरस भारतातील लोकांना त्रासदायक ठरु शकतो का? याच पार्श्वभूमीवर नवीन कोरोना व्हायरसच्या प्रकाराबाबत सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे असे कोविड 19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुत पंडित यांचे म्हणणे आहे.

>> TRP प्रकरणात 15 वी अटक, बार्कचे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांना अटक 

काय आहे ही नवीन स्ट्रेन ? 

केंट आणि लंडनमध्ये आढळलेल्या काही प्रकरणानंतर इंग्लडच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने याच्या काही केसेसवर काम केले. या प्रकाराला 'VUI - 202012/01' (डिसेंबर 2020 मधील पहिले व्हेरिएंट अंडर इन्व्हेस्टिगेशन) असे नाव देण्यात आले आहे. व्हायरसमध्ये बदल होणे हे असामान्य नाही. दरवर्षी इन्फ्लूएंझा मध्येही बदल आढळतो. स्पेनसारख्या इतर देशांमध्येही सार्स-कोविड-2 चे प्रकार आढळून आले आहेत. संशोधकांच्या मते, या विषाणूमध्ये कमीत कमी 17 बदल होते. स्पाइक प्रोटीनच्या या भागाच्या बदलांमुळे व्हायरस अधिक संसर्गजन्य होऊ शकतो आणि लोकांमध्ये सहजपणे पसरतो.

>> लॉकडाऊनमध्ये कुटुंबाची झोपमोड, घोरण्याच्या समस्येत 20 टक्क्यांनी वाढ 

हा स्ट्रेन खरंच घातक ?
 
बहुतेक बदल एकतर विषाणूसाठी हानिकारक ठरतात किंवा त्याचा काहीच परिणाम होत नाही. मात्र, या नवीन प्रकारात काही बदल असे दिसत होते जसे की कोरोनाव्हायरस किती आणि कसा पसरेल त्यावर अवलंबून परिणाम होऊ शकतो. अहवालानुसार, सार्स कोविड -2 चे नवीन रूप जुन्या प्रकारापेक्षा 70 टक्के अधिक संसर्ग पसरवू शकतो. त्यातही सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या स्ट्रेनपासून 30-60 वर्षे वयोगटातील लोकांना अधिक धोका आहे. यूकेच्या प्राथमिक आकडेवारीनुसार असे दिसून आले आहे की दक्षिण इंग्लंडच्या भागात हा विषाणू लवकर पसरत आहे. मात्र, या स्ट्रेनचा किती लवकर गुणाकार होतो हा प्रश्न अजून अनुत्तरीत आहे.

नवीन स्ट्रेन आतापर्यंत भारतात सापडलेला नाही. दरम्यान, हे रूप आधीच जागतिक स्तरावर पसरले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, यूके व्यतिरिक्त डेन्मार्क, बेल्जियम, नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलियामध्येही हा प्रकार आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतही असाच वेगळा प्रकार ओळखला गेला आहे. शिवाय, भारत सरकारने घेतलेल्या तात्काळ निर्णयांमुळे परदेशातून आलेल्या लोकांनाही क्वारंटाईन करणे किंवा त्यांच्या चाचण्या करणे अशी काही महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. त्यामुळे, किमान अजूनतरी या स्ट्रेनची भीती बाळगणे गरजेचे नाही. 

>> TRP प्रकरणात 15 वी अटक, बार्कचे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांना अटक 

त्रिसुती पाळणे कायम गरजेचे -
 

आपले हात धुणे, फेस मास्क लावणे आणि सामाजिक अंतर राखणे ही त्रिसुत्री पाळणे कायम गरजेचे असल्याचे ही डॉ. पंडित यांनी स्पष्ट केले आहे. नवीन प्रकाराचा प्रसार मर्यादित करण्यासाठी शिफारस केलेल्या नियमांचे आणि मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करणे आवश्यक आहे असेही डॉ. पंडित यांनी सांगितले आहे. 

( संपादन : सुमित बागुल )

know all detail information about new strain of covid 19 virus found in UK

loading image