ठाणे : कोरम मॉलवर कारवाईची टांगती तलवार; आठ कोटींचा मालमत्ता कर थकीत

Thane Municipal
Thane Municipal sakal media
Updated on

ठाणे : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा (corona infection) परिणाम ठाणे महापलिकेच्या (thane municipal corporation) विविध विभागांच्या कर वसुलीवर झाला होता. त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती (financial crisis) नाजूक झाली आहे. त्यात आता, पालिकेने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसून येत आहे. ठाण्यातील कोरम मॉल (thane korum mall) व्यवस्थापनाने सुमारे आठ कोटींचा मालमत्ता कर थकविल्याने (property tax dues) पालिका प्रशासन कारवाईचा बडगा उगारण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार नुकतीच पालिकेच्या पथकाने कोरम मॉलच्या व्यवस्थापनाची भेट घेत थकीत मालमत्ता कराचा भरणा लवकरात लवकर करा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला.

Thane Municipal
मुंबई : पश्चिम रेल्वेवरून किसान रेल्वेच्या 101 फेऱ्या पूर्ण

कोरोना प्रादुर्भावाचा फटका ठाणे महापालिकेच्या तिजोरिला मोठ्या प्रमाणात बसला आहे. पालिकेला गाडा हाकलण्याची प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे. त्यात जमा आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्याची कसर करावी लागत आहे. शासनाकडून मिळणाऱ्या वस्तू आणि सेवा करातून अधिकारी-कर्मचारी पगार दिले जात आहेत, तर मुद्रांक शुल्काच्या अनुदानातून ठेकेदारांची देणी दिली जात आहेत. इतर विभागांच्या कर वसुलीत फारशी वाढ होताना दिसून येत नाही. त्यामुळे मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुलीवर प्रशासनाने विशेष लक्ष दिले असून मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

थकबाकीदारांच्या यादीमध्ये ठाण्यातील कोरम मॉलचाही समावेश आहे. या मॉलने मागील वर्षीची आणि चालू वर्षाचे सुमारे साडे आठ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. या कराच्या वसुलीसाठी पालिकेचे पथक मंगळवारी (ता.२) कोरम मॉलमध्ये गेले होते. पथकाने मॉल व्यवस्थापनाची भेट घेऊन त्यांना कराचा भरणा करण्यास सांगितले. मात्र, एकदम एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी टप्प्याटप्प्याने रक्कम भरा आणि ही रक्कम केव्हापर्यंत भरली जाणार, याचे लेखी पत्र द्या, अशी सूचना पालिकेने केली. तसेच कराचा भरणा लवकर न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.

"ठाणे शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांनी कराचा भरणा केला नाही तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कोरम मॉलने आठ कोटींचा मालमत्ता कर थकविला आहे. हा थकीत कर भरणा लवकर न केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल."

- संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, ठाणे पालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com