esakal | दिवाळीच्या पूर्व संध्येला ATMची साडे चार कोटींची रोख लंपास, व्हॅनही पळवली
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीच्या पूर्व संध्येला ATMची साडे चार कोटींची रोख लंपास, व्हॅनही पळवली

 विरारच्या बोळींज येथे कोटक महिंद्रा बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे भरणारी व्हॅन चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

दिवाळीच्या पूर्व संध्येला ATMची साडे चार कोटींची रोख लंपास, व्हॅनही पळवली

sakal_logo
By
विजय गायकवाड

मुंबईः  विरारच्या बोळींज येथे कोटक महिंद्रा बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे भरणारी व्हॅन चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

व्हॅनच्या ड्रायव्हरने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.  या व्हॅनमध्ये अंदाजे चार कोटी पेक्षा जास्त कॅश असल्याची ही माहिती मिळत आहे. मात्र पोलिस अधिकृतरित्या किती कॅश आहेत त्याबाबची माहिती देत नाहीत. कंपनीकडून अधिकृत माहिती मिळाल्यावर रक्कम कंन्फर्म करता येईल असं पोलिसांनी सांगितले आहे.

गुरुवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास विरार पश्चिमेकडील बोळींज येथील कोटक महिंद्रा बॅंकेतील एटीएम मध्ये पैसे टाकण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅनमध्ये पैसे टाकण्यासाठी दोन लोडर कर्मचारी पैसे भरण्यासाठी एटीएम मध्ये गेल्यावर, ड्रायव्हर कॅश व्हॅन घेवूनच पळून गेल्याची माहिती प्राथमिक समोर आली आहे.

अधिक वाचा-  शेठजी, जरा जपून; किरीट सोमय्यांच्या आरोपांवर संजय राऊतांचा पलटवार

कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गाडीतून मॅनेजर आणि बॉडीगार्ड खाली उतरले. दोघेही जण खाली उतरल्यावर ड्रायव्हरने व्हॅन सुसाट पळवली. बॉडीगार्ड आणि मॅनेजरने जोरात आरडाओरडा केला. मात्र ड्रायव्हर वेगाने निघून गेला.

या व्हॅनमध्ये अंदाजे चार कोटी रक्कम असल्याची माहिती मिळत आहे. सध्या पोलिसांनी सर्व रस्त्यावर नाकाबंदी लावली असून तीन विशेष पथक यासाठी रवाना केले असल्याची माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या झोन 2 चे डीसीपी संजय पाटील यांनी दिली आहे.

अधिक वाचा-  उर्जामंत्र्यांचे आश्‍वासन हवेत विरलं, वीज ग्राहकांचा अपेक्षाभंग

----------------

(संपादन- पूजा विचारे)

kotak bank four and half crore cash Stolen ATM virar

loading image