esakal | मुंबई विमानतळावर क्रिकेटर कृणाल पांड्याला DRI ने घेतलं ताब्यात, चौकशी सुरु!

बोलून बातमी शोधा

मुंबई विमानतळावर क्रिकेटर कृणाल पांड्याला DRI ने घेतलं ताब्यात, चौकशी सुरु!}

मिळालेल्या अधिक माहितीनुसार दुबईहून मुंबईत परतलेल्या खेळाडू कृणाल पांड्याची मुंबई विमानतळावर चौकशी केली जातेय

मुंबई विमानतळावर क्रिकेटर कृणाल पांड्याला DRI ने घेतलं ताब्यात, चौकशी सुरु!
sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : मुंबई इंडियन्स संघातील क्रकेटर कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आलंय. (Directorate of Revenue Intelligence) डीआरआयने खेळाडू कृणाल पांड्याला ताब्यात घेतलंय. भारतात येताना कृणाल पांड्याने निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक सोनं भारतात आणल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.  

मिळालेल्या अधिक माहितीनुसार दुबईहून मुंबईत परतलेल्या खेळाडू कृणाल पांड्याची मुंबई विमानतळावर चौकशी केली जातेय. निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक सोनं भारतात आणल्याप्रकरणी कृणाल पांड्याला विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं आहे. UAE मधून मुंबईत परतत असताना जे कस्टम डिक्लेरेशन दिले जाते त्या क्षमतेपेक्षा जास्त सोनं कृणालकडे सापडलं आहे. .

महत्त्वाची बातमी - कोरोनासाठी महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक

सोबतच त्याच्याकडे काही किमती घड्याळे देखील आढळून आली आहेत. दरम्यान कस्टम विभागाला याची नोंद न दिल्याने सध्या मुंबई विमानतळावर कृणालला ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबई विमानतळावरील DRI अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी सुरु आहे. कृणालकडे आढळून आलेलं सोनं आणि घड्याळं दुबईत कुठे घेतली गेलीत, त्यांची किंमत काय आहे, त्यांची बिले आहेत का? या आणि यासारख्या बाबींची मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे. 

cricketer krunal pandya detained on mumbai airport read full news