esakal | क्षितिज प्रसादचा 'एनसीबी'वर दबावाचा आरोप; रणबीर, अर्जुनचे नाव घेण्यासाठी दबाव?
sakal

बोलून बातमी शोधा

क्षितिज प्रसादचा 'एनसीबी'वर दबावाचा आरोप; रणबीर, अर्जुनचे नाव घेण्यासाठी दबाव?

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील अमलीपदार्थ प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी क्षितिज प्रसादने एनसीबीच्या तपास अधिकाऱ्यांविरोधात विशेष न्यायालयात तक्रार केली आहे.

क्षितिज प्रसादचा 'एनसीबी'वर दबावाचा आरोप; रणबीर, अर्जुनचे नाव घेण्यासाठी दबाव?

sakal_logo
By
सुनिता महामुणकर

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील अमलीपदार्थ प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी क्षितिज प्रसादने एनसीबीच्या तपास अधिकाऱ्यांविरोधात विशेष न्यायालयात तक्रार केली आहे. न्यायालयाने क्षितिजला ता. 6 पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास; दुर्लक्ष न करण्याचा सल्ला

क्षितिजला आज रिमांडसाठी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. एनसीबीचे तपास अधिकारी दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता दिनो मौरियो, अर्जुन रामपाल आणि रणबीर कपूर यांची नावे खोट्या पध्दतीने घेण्यासाठी दबाव आणत आहेत, असा दावा
क्षितिजने केला आहे. तसेच पोलिसांना मी कोणताही कबुली जबाब दिलेला नसून ते अत्यंत अवमानस्पद आणि लाजीरवाणी वागणूक देत आहेत, असे क्षितिजने सांगितले.

बॉलीवूडमधील काही जणांची नाव घेण्यासाठी मला सातत्याने दबावाखाली ठेवले जात आहे. माझ्या कौटुंबिक देखील सतत मानसिक त्रास दिला जात आहे, अशी तक्रार त्याने केली. एनसीबीने अटक केलेल्या ड्रग विक्रेता संकेत या आरोपीने क्षितिजचे नाव घेतल्याचा दावा एनसीबीने केला आहे. पण संकेतला मी ओळखत नाही, असा जबाब क्षितिजने दिला आहे. तसेच एनसीबीने जबरदस्तीने घेतलेला जबाबही नाकारल्याचे स्पष्ट केले आहे. कार्यकारी निर्माता असलेला क्षितिज या प्रकरणातील वीसावा अटक आरोपी आहे.

हेही वाचा - देवनार पशुवधगृहातील बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीला सुरुवात

या आरोपांचे खंडन एनसीबीकडून करण्यात आले. प्रसादला कोणताही छळ केला नसून त्याला त्याच्या पत्नीशीही भेटू दिले, असे एनसीबीकडून सांगण्यात आले.
विशेष न्या गुरव यांनी संबंधित तपास अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले. आरोपीकडून एड सतीश मानेशिंदे यांनी बाजू मांडली. पोलीस कोठडीची आवश्यकता नसून न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top