कुडपण टेम्पो अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल; क्षमतेहून अधिक प्रवासी भरल्याचा आरोप

कुडपण टेम्पो अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल; क्षमतेहून अधिक प्रवासी भरल्याचा आरोप

पोलादपूर  : लग्नाचे वऱ्हाड घेऊन येणारा टेम्पो पोलादपूर तालुक्‍यातील कुडपण येथील 200 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातप्रकरणी टेम्पोचालक बंटी ऊर्फ नीलेश दळवी याच्यावर पोलादपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्धारित वेग क्षमतेचे उल्लंघन तसेच क्षमतेहून अधिक नागरिकांना टेम्पोमध्ये बसवल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलादपूर तालुक्‍यातील पोलादपूर कुडपण मार्गावर शुक्रवारी (ता. 8) सायंकाळी 6.30 च्या सुमारास झालेल्या या अपघातात चालकासह 63 प्रवासी जखमी झाले होते; तर तीन जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी परिसरातील रहिवासी तसेच अपघाताचे प्रत्यक्षदर्शी सय्यद जोगीलकर यांनी पोलादपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लग्नानंतर आरोपी बंटी दळवी टेम्पो चालवत वऱ्हाडी मंडळींना घेऊन कुडपण मार्गे खेड तालुक्‍यातील खवटी, धनगरवाडी येथे जात होता. कुडपण येथे रस्ता अरुंद तसेच तीव्र चढ-उताराचा होता. त्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तो रस्ता निसरडाही झाला होता. पोलिस तपासात टेम्पोचे चाकदेखील योग्य दर्जाचे नसल्याचे समोर आले आहे; तरीही चालकाने या मार्गावर भरधाव वेगात वाहन चालवल्याने कुडपणनजीकच्या धनगरवाडी येथील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व रस्त्याचे संरक्षक कठडे तोडून टेम्पो थेट दरीत कोसळला. याप्रकरणी चालक बंटी दळवी याच्या विरोधात कलम 304, 337, 338 आदीनुसार दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलादपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव करीत आहेत. 
दरम्यान, खेड तालुक्‍यातील जखमींना रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सात जण गंभीर जखमी असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दहा जणांची प्रकृती ठीक असल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. 

घटनास्थळी पुन्हा शोध 
अपघाताच्या घटनास्थळी शनिवारी पुन्हा पोलिस प्रशासन, आरटीओ, बचाव पथकातर्फे पाहणी करण्यात आली व दरीत, परिसरात कोणी अडकले आहे का, याबाबत शोध घेण्यात आला. तपासात कोणीही मिळालेले नसून कोणी हरवल्याची तक्रारही आलेली नाही, अशी माहिती पोलादपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी दिली. 

 Kudpan tempo accident case filed against driver Alleged overcrowding

--------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com