
Latest Mahrashtra News: कुर्ला येथे सोमवारी झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन तरुण मुला-मुलींचा हकनाक जीव गेला. यातील कुणाला केक शेफ बनायचे होते, तर कुणाला आई-वडिलांना आधार देत घर चालवायचे होते. एकाला उच्च शिक्षण घ्यायचे होते; मात्र अर्ध्यावरती डाव मोडल्याने या सर्वांचे स्वप्न अपूर्णच राहिले.