डोंबिवली : खरड गावात वीटभट्टीवर भीषण आग; मजुरांची घरं जळून खाक | Dombivali news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire Incident

डोंबिवली : खरड गावात वीटभट्टीवर भीषण आग; मजुरांची घरं जळून खाक

डोंबिवली : कल्याण ग्रामीण मलंगगड येथील खरड गावात (Kharad village) वीटभट्टीवर गुरुवारी सायंकाळी अचानक आग (fire at brick kiln) लागल्याची घटना घडली. आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. यामुळे वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची घर आगीत पूर्ण जळून खाक (house burnt) झाली आहेत.

हेही वाचा: मुंबईत क्रूझ प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार

ग्रामीण भागात वीटभट्टीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून कर्जत कसारा येथील मजूर परिवारासह वीटभट्टी वर कामासाठी आलेले आहेत. भट्टीच्या परिसरातच या मजुरांना झोपडी उभारण्यासाठी जागा दिली जाते. तसेच जवळून जाणाऱ्या महावितरणच्या विजेच्या तारांवर आकडे टाकून त्यांना चोरून वीज पुरवठा देखील केला जातो. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

खरड गावातील वीटभट्टी वर लागलेल्या आगीच्या ठिकाणी केमिकलचा साठा करून ठेवण्यात आला होता अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र नक्की कोणते केमिकल, कशासाठी हा साठा करण्यात आला होता ही माहिती उघड झाली नाही.

Web Title: Labor Houses Burnt In Fir Incident At Brick Kiln In Kharad Village Dombivali News Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Fire Accidentdombivali