
कामगार नेते,शिवसेना पुरस्कृत भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष माजी आमदार सुर्यकांत महाडिक यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, मुलं असा परीवार आहे.
मुंबई - कामगार नेते,शिवसेना पुरस्कृत भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष माजी आमदार सुर्यकांत महाडिक यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, मुलं असा परीवार आहे.
भारतीय रिझव्ह बॅकेत नोकरीला असता तेथील कामगार संघटनेचे महाडिक नेतृत्व करत होते.तेव्हा पासून कामगार मान्य नेता म्हणून त्यांची ओळख होती.नंतर 18 वर्ष त्यांनी भारतीय कामगार सेनेचे नेतृत्व केले.शिवसेनेने त्यांच्यावर उपनेता पदाची जबाबदारी सोपवली होती. महाडिक यांच्या निधनामुळे कामगार चळवळीची मोठी हानी झाली अशा शब्दात माजी राज्यमंत्री,कामगार नेते सचिन अहिर यांनी शोक व्यक्त केला
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
महाडिक यांनां प्रकृती अस्वास्था मुळे चेंबूर येथील झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान आज रात्री त्यांचे निधन झाले.त्यांचे पार्थिव उद्या सकाळी चेंबर घाटलागाव येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी सकाळी 7 ते 10 या वेळेत ठेवण्यात येणार आहे.
Labor leader Suryakant Mahadik dies in mumbai