जेजे रुग्णालयांत रेबीजच्या इंजेक्‍शनचा तुटवडा 

नेत्वा धुरी
बुधवार, 8 मे 2019

मुंबई : भायखळ्यातील जेजे रुग्णालयांत सध्या कुत्र्यांच्या चाव्यानंतर आवश्‍यक रेबीजच्या इंजेक्‍शनचा तुटवडा सुरु आहे. पालिका रुग्णालयांतील सर्व रुग्ण जेजे रुग्णालयात येत असल्याने या रुग्णालयांतही औषधांचा साठा कमी असल्याची माहिती जेजे समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले यांनी दिली. ही जीवरक्षक औषधे असल्याने स्थानिक बाजारपेठ आणि राज्यातील इतर रुग्णालयांतून इंजेक्‍शन जेजे रुग्णालयाने मागवली आहेत. 

जेजे रुग्णालयांत सध्या सत्तर रुग्ण कुत्रा चावल्याच्या तक्रारीने दाखल होत आहेत. औषधांच्या कमतरतेमुळे गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना केवळ जेजे रुग्णालयात उपचार दिले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. इतर रुग्णांना खासगी रुग्णालयांत उपचार घ्यावे लागत असल्याने रेबीज इंजेक्‍शनसाठी तब्बल दीड हजारापर्यंत खर्च येत आहे. जेजे रुग्णालयाला हाफकिन औषध निर्मिती मंडळाकडून औषधांचा साठा पुरवला जातो. गेल्या वर्षाच्या आर्थिक वर्षांतील साठा जेजे रुग्णालयांत अगोदरच संपला आहे. येत्या वर्षाच्या रेबीजच्या इंजेक्‍शनचे अंदाजपत्रक हाफकिनला अगोदरच पाठवण्यात आले परंतु त्याबाबत अद्यापही हाफकिनकडून काहीच माहिती उपलब्ध झाली नसल्याची माहितीही जेजे रुग्णालय समूहाचे अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले यांनी दिली. 

सोमवारी केवळ चार दिवस पुरेल एवढाच रेबीजच्या इंजेक्‍शनचा साठा रुग्णालयात उपलब्ध होता. मंगळवारी अजून चार दिवस पुरेल अशी तरतूद जेजे रुग्णालयाकडून केली जाईल. सध्या पुणे, जळगाव आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयातूनही इंजेक्‍शनचा साठा आणण्याचे जेजे रुग्णालयाचे प्रयत्न सुरु आहेत. हाफकिनच्या औषध पुरवठ्याचा प्रभारी कामकाज पाहणारे व आरोग्य भवनाचे प्रभारी संचालक आयुक्त डॉ अनुपकुमार यादव यांनी विचारला असताना त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

कुत्र्याच्या चाव्याच्या तक्रारीने जेजेत दाखल झालेल्या रुग्णांची संख्या- सत्तर 

पालिका रुग्णालयांत रेबीजच्या इंजेक्‍शनची संख्या पुरेशी आहे. या इंजेक्‍शनचा तुटवडा झालेला नाही. 
- डॉ. पद्मजा केसकर, पालिका आरोग्य अधिकारी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lack f rabies injections in JJ Hospital