ठाणे जिल्ह्यात रेशनिंग धान्याचा तुटवडा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 एप्रिल 2020

लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारने रेशनिंग दुकानात पिवळ्या-केशरी शिधापत्रिका धारकांना धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जिल्ह्यात रेशनिंग दुकानात धान्याचा तुटवडा असून शिधापत्रिका धारकांना केवळ तांदूळच मिळत असल्यामुळे, आम्ही आता खायचे काय? असा सवाल शिधापत्रिका धारक करत आहेत.

टिटवाळा : लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारने रेशनिंग दुकानात पिवळ्या-केशरी शिधापत्रिका धारकांना धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जिल्ह्यात रेशनिंग दुकानात धान्याचा तुटवडा असून शिधापत्रिका धारकांना केवळ तांदूळच मिळत असल्यामुळे, आम्ही आता खायचे काय? असा सवाल शिधापत्रिका धारक करत आहेत.

क्लिक करा : धक्कादायक...! मुंबईत संशयितांकडून आरोग्य यंत्रणेची दिशाभूल

जिल्ह्यातील रेशनिंग प्राधान्यधारक, शिधापत्रिका धारक आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना केवळ तांदूळच दिला जात आहे. रेशनिंग दुकानात डाळ, गहू, साखर दिली जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरी डाळ, गहू आणि तेल, साखर रेशनिंग दुकानात मिळत नसल्याने गोरगरिबांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे.  

कल्याण तालुक्यात 28 शिधावाटप दुकाने आहेत. या दुकानात एप्रिल महिन्यात 11 हजार 728 प्राधान्य धारक शिधापत्रिकांमधील 52 हजार 700 नागरिकांना धान्य मिळाले, तर अंत्योदय मधील 2 हजार 604 शिधापत्रिकेच्या 10 हजार 653 नागरिकांना धान्य फक्त तांदूळ मिळाला आहे.

क्लिक करा : उल्हासनगरातील शिवनेरी रुग्णालय सील

ठाणे जिल्ह्यातील शिधावाटप दुकानात नियमित शिधापत्रिकाधारकांना तांदूळ उपलब्ध झाला आहे. डाळ व गहू आलेले नाही, केशरी व पिवळ्या रेशनिंग न मिळणाऱ्या शिधापत्रिका धारकांना मे महिन्यात धान्य उपलब्ध होईल.
- राजू थोटे,
जिल्हा पुरवठा अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of rationing grain in Thane District