esakal | मुलीच्या पावलांचे पूजन करून लक्ष्मीपूजन संपन्न; गावंड दांपत्याचा समाजापुढे आदर्श
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीच्या पावलांचे पूजन करून लक्ष्मीपूजन संपन्न; गावंड दांपत्याचा समाजापुढे आदर्श

चिरनेल येथील गावंड दांपत्याने लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याच मुलीच्या पावलांचे पूजन करून समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.

मुलीच्या पावलांचे पूजन करून लक्ष्मीपूजन संपन्न; गावंड दांपत्याचा समाजापुढे आदर्श

sakal_logo
By
सुभाष कडू

उरण : दिवाळीतील महत्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन. या दिवशी घरोघरी लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. चिरनेल येथील गावंड दांपत्याने लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याच मुलीच्या पावलांचे पूजन करून समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.

हेही वाचा - गोरेगावमध्ये पोलिस कारवाईच्या नावाने खंडणी मागणारे दोघे अटकेत

दिवाळीत प्रत्येक कुटूंबीय आपल्या प्रथांनुसार लक्ष्मीपूजन करत असतात. चिरनेरच्या गावंड दांपत्याने वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. देवी लक्ष्मीची पूजन म्हणजे स्त्री शक्तीचे पूजन होय. आपल्या मुलीला ही गावंड दांपत्य लक्ष्मीस्वरूप मानतात. मुलीचा जन्म झाल्यानंतर त्याच्या कुटूंबात भरभराटी आली असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे योगेश गावंड व त्याची पत्नी उज्वला गावंड यांनी आपल्या मुलीच्या पावलांचे पूजन करीत लक्ष्मीपूजन विधिवत संपन्न केले.

कोणतीही स्त्री ही लक्ष्मीच आसते तीला आपण तो दर्जा द्यायला हवा. आपल्या आई, बहीण, पत्नी व मुलीच्या रुपाने आपल्या जीवनात तिचा वावर आसतो. मी माझ्यापासून सुरुवात केली आहे. समाजात पण ही चांगली पद्धत रुढ व्हावी ही आपेक्षा

- योगेश गावंड

Lakshmi Pujan performed by worshiping the daughter by Gawand family chirnel 

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )