esakal | कोविड नियमांचे पालन करुन यंदा लालबागच्या राजाचा दरबार सजणार
sakal

बोलून बातमी शोधा

Lalbaugcha Raja

कोविड नियमांचे पालन करुन यंदा लालबागच्या राजाचा दरबार सजणार

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : लालबागचा राजा (lalbaugcha raja) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य आणि केंद्र सरकारने (state and central government) कोरोनाच्या नियमावली (corona rules) व वेळोवेळी जाहिर होणाऱ्या निर्बंध, अटी सूचनांचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव साजरा (Ganpati festival) करणार आहे. कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेचा (corona third wave) धोका व्यक्त केला जात असताना, लालबागच्या राजाचा दरबार भरणार आहे. यावेळी राज्य सरकारने (state government) जाहिर केलेल्या नियमावलीचे पालन करून यंदाची लालबागची मूर्ती ही 4 फुटांपेक्षा उंच नसेल, असे मंडळाकडून सांगण्यात आले. ( Lalbaugcha raja Ganpati festival celebration following corona rules-nss91)

हेही वाचा: MPSC : रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाने जारी केला 'जीआर'

कोरोना महामारीमुळे मागच्या वर्षी लालबागमध्ये गणेश उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे येथे गणेश उत्सवाऐवजी रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेट कॅम्प लावण्यात आले होते. परंतु यावर्षी लालबाग गणेशोत्वसाचे आयोजन होणार आहे. सरकारच्या नियमावलीनुसार लालबागमध्ये श्री गणरायाची मूर्ती 4 फुटापेक्षा जास्त उंच नसेल. जे लोक घरात गणपतीची मूर्ती स्थापन करतील ते 2 फुटापेक्षा जास्त उंच मूर्ती ठेवू शकत नाहीत. याशिवाय आयोजनाच्या दरम्यान कोरोना नियमांचे विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे, कोरोना संकट लक्षात घेता गणेशोत्सव एकदम साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली.

''राज्य सरकारने जाहिर केलेल्या नियमावलीनुसार लालबागचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. राज्य सरकारकडून नियमावलीमध्ये शिथिलता आणण्याची मागणी केली जात होती. मात्र, अद्याप मागणी पूर्ण झाली नाही. एक महिन्यांवर गणेशोत्सव आल्याने आता लालबागच्या गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे. 4 फूटांपेक्षा जास्त उंच गणेशमूर्ती नसेल. तर, रक्तदान शिबिर व अन्य सामायिक उपक्रमाचे राबविण्याचे अद्याप नियोजन झाले नाही.''

- सुधीर सावंत, मानद सचिव, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

loading image
go to top