Lalbaugcha Raja : लालबागचा राजा यंदा अश्याप्रकारे करणार नागरिकांना मदत !

 Ganpati Visarjan Live Lalbaugcha raja and ganesh galli Mumbai
Ganpati Visarjan Live Lalbaugcha raja and ganesh galli Mumbai esakal

Lalbagcha Raja : लालबागचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्य असणारा ‘पान-सुपारी’ कार्यक्रम २४ सप्टेंबर रोजी राजाच्या दरबारात होणार आहे. यंदा दरडग्रस्त इर्शाळवाडीतील पीडितांना मदत करून दुर्घटनेमध्ये मदत केलेल्या हातांचा सन्मान केला जाणार आहे.

मुंबईसह देश-विदेशातील गणेशभक्त श्री गणरायाची वाट बघत असतो. गणपती बाप्पाच्या अशा भक्तांसाठी मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. ‘पान-सुपारी’ हा त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि लालबागच्या राजाच्या परंपरेतील महत्त्वाचा कार्यक्रम असतो. ‘पान-सुपारी’मध्ये मंडळाकडून आपले सामाजिक दायित्व जपले जाते. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्ती, सामाजिक संघटना यांचा सन्मान केला जातो. यंदा २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी हा कार्यक्रम राजाच्या दरबारात होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.

 Ganpati Visarjan Live Lalbaugcha raja and ganesh galli Mumbai
Lalbaugcha Raja 2023: 'लागबागच्या राजा'चे पाद्यपूजन, घ्या खास दर्शन..

लालबागच्या राजाचे आज प्रथम दर्शन

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव यंदा १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२३ दरम्यान साजरा होणार आहे. या गणेशोत्सव सोहळ्याच्या अनुषंगाने लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन अर्थात फोटो सेशन आज सायंकाळी ठीक ७ वाजता आयोजित करण्यात आले आहे. गणेशभक्तांना राजाचे सर्वप्रथम दर्शन विविध समाजमाध्यमांसह वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून करता येईल, अशी माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.

 Ganpati Visarjan Live Lalbaugcha raja and ganesh galli Mumbai
Lalbaugcha Raja 2023: 'लागबागच्या राजा'च्या पाद्यपूजनाने मुंबईत गणेशोत्सवाचा श्रीगणेशा! पहा खास फोटो..

या वेळी इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांना सढळ हस्ते आर्थिक मदत देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. शिवाय, पीडितांच्या पुनर्वसनातनदेखील सहकार्य केले जाणार आहे. याशिवाय या दुर्घटनेत आपल्या जीवाची बाजी लावून मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मानदेखील केला जाणार आहे. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 Ganpati Visarjan Live Lalbaugcha raja and ganesh galli Mumbai
Dog Died Due To Poison: उंदराचे विषारी पदार्थ खाल्ल्याने पाळीव श्वानाचा मृत्यू; पेस्ट कंट्रोल करणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com