राजधानी एक्‍स्प्रेसच्या मार्गात दरड

राजधानी एक्स्प्रेसच्या मार्गात दरड कोसळली आहे.
राजधानी एक्स्प्रेसच्या मार्गात दरड कोसळली आहे.

पेण : कोकण रेल्वे मार्गावर पेण तालुक्‍यातील जिते - खारपाडा दरम्यान रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास दरड कोसळली. राजधानी एक्‍स्प्रेस या ठिकाणाहून पुढे जाण्याच्या काही मिनिटी आधी ही घटना घडली. मोटरमनने सावधानता बाळगल्याने या एक्‍स्प्रेसचा मोठा अपघात टाळला. दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर आहे. 

रायगड जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळ आहे. त्याचा जोर शनिवारी रात्री वाढला. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक विस्कळित झाली. मुंबई - गोवा महामार्गही अनेक ठिकाणी पाण्याखाली गेला आहे. महामार्गावरील वडखळ नाका पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. वडखळ नाक्‍यावर पाच ते सहा फूट पाणी साचले होते. यामुळे गोवा आणि अलिबागकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली. 

कोकण रेल्वे मार्गावरही पाणी साचले आहे. पेण तालुक्‍यात या मार्गावर दरड कोसळली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार राजधानी एक्‍स्प्रेस या ठिकाणाहून पुढे जाण्याच्या काही मिनिटे आधी दरड कोसळली. मोटरमनने सतर्क होत दरडीच्या काही मीटर आधी एक्‍स्प्रेस तांबवल्याने अपघात टळला. 

पेण शहर पाण्याखाली 
पेण शहराजवळून जाणारी भोगावती नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी शहरातील उत्कर्ष नगर, चावडी नाका, शंकर नगर आदी परिसरातील घरांत घुसले आहे. कोळीवाडा, विठ्ठल आळी, बस तांबा, विक्रम स्टॅंड, चिंचपाडा, अंतोरे रोड, पेण शहरातील पेण पोलिस चौकी समोर प्रवेशद्वारावर पाच ते सहा फूट पाणी साचले होते. महामार्गाच्या उड्डाण पुलाच्या बांधकामात पाण्याचा निचरा होणारा मार्ग बंद करण्यात आल्याने पेण शहराच्या प्रवेशद्वारावर पाणी साचते. 
तालुक्‍यातून वाहणाऱ्या भोगावती, निगडे, बाळगंगा, पाताळगंगा या नद्यांनी धोक्‍याची पातळी ओळांडली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com