राष्ट्रपती भवनातील शेवटची चोरी; प्रणव मुखर्जींच्या एका शब्दाने 'त्याचे' आयुष्य बदलले 

विनोद राऊत
Monday, 31 August 2020

प्रणव मुखर्जी यांच्या 'ट्री मॅन' या एका शब्दाने या युवकाचे आयुष्य बदलले.

 

मुंबई  : जेथे जाईल तेथून रोपटे चोरायची सवय. नंतर त्यांची कुठेतरी लागवड करायची. त्यामुळे अख्खे गाव या तरुणाला पौधा चौर म्हणून चिडवायचे. मात्र, प्रणव मुखर्जी यांच्या 'ट्री मॅन' या एका शब्दाने या युवकाचे आयुष्य बदलले. नंतर कोणत्याही सरकारी मदतीशिवाय त्याने देशात तब्बल 50 लाख झाडांची लागवड, संवर्धन केले. राजस्थानच्या विष्णू लांबा यांची ही कहाणी. 'पौधा चोर ते ट्री मॅन' असा प्रवास केवळ प्रणवदा यांच्या प्रेरणेने होऊ शकला, अशी भावना त्यांनी 'सकाळ'कडे व्यक्त केली. 

अनलॉक 4 : राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी 'ई-पास' सक्ती रद्द; जाणून घ्या इतर सर्व नियमावली

राजस्थानच्या विष्णू लांबा यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या 52 लोकांचे वारसदार शोधून काढले आहेत. 2 वर्षाच्या या शोधमोहीमेनंतर  2012 मध्ये काही निवडक वारसदारांना प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले होते. या हुता्म्यांना शोधून काढणारा मुलगा कोण, असे कुतुहलाने त्यांनी विचारले.  महाराष्ट्रातील शहिद विष्णू  पिंगळे यांचे वारसदार राजेंद्र पिंगळे यांनी प्रणव मुखर्जी यांना विष्णू लांबा यांची ओळख करुन दिली. या तरुणाला 'पौधा चोर' असे म्हटले जाते, असे पिंगळे यांनी सांगताच प्रणव मुखर्जी यांनी राग व्यक्त करत हा मुलगा पौधा चोर नाही 'ट्री मॅन' आहे असे उद्गार काढले. लांबा यांच्या पाठीवर हात फिरवत पर्यावरणाच्या कामाला वाहून दे. हे काम सोडू नकोस, असा आशीर्वाद त्यांनी दिला. प्रणव मुखर्जी यांच्या या शब्दाने आयुष्य बदलले आणि वृक्ष लागवडीला जिवनाचे ध्येय बनवले. मला देशात या मोहीमेदरम्यान आजपर्यंत कधीच त्रास झाला नाही, अस विष्णू लांबा यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

राष्ट्रपती भवनातील शेवटची चोरी; प्रणव मुखर्जींच्या एका शब्दाने 'त्याचे' आयुष्य बदलले 

शेवटची चोरी राष्ट्रपती भवनात
राष्ट्रपती भवनात सवयीप्रमाणे मी भवनाच्या कुंडीतील एक कॅक्टसचे फूल तोडले आणि खिशात ठेवले. मात्र, ही माझी शेवटची  चोरी होती. त्यानंतर आयुष्यात मी कधी झाड चोरले नाही. ही प्रणवदांच्या शब्दाची ताकत होती, असे लांबा सांगतात. 2012 नंतर प्रणवदांना भेटण्याची संधी मिळाली नाही. एकदा लोकसभा अध्यक्षांसोबत घरी गेलो होतो. मात्र, दादा घरी नव्हते. 

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The last burglary at the Presidential Palace; One word from Pranab Mukherjee changed his life