ऋषी कपूर यांच्या चाहत्यांना खूशखबर!  फरहान अख्तर, रितेश सिधवानी 'शर्माजी नमकिन' करणार पूर्ण

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 2 May 2020

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ’शर्माजी नमकिन’ त्यांच्या चाहत्यांना पाहता येणार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण रखडणार होते. परंतु, लॉकडाऊन संपल्यानंतर चित्रीकरण पूर्ण करण्यात येईल, असे एक्सेल एंटरटेन्मेंटतर्फे फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी सांगितले. 

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ’शर्माजी नमकिन’ त्यांच्या चाहत्यांना पाहता येणार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण रखडणार होते. परंतु, लॉकडाऊन संपल्यानंतर चित्रीकरण पूर्ण करण्यात येईल, असे एक्सेल एंटरटेन्मेंटतर्फे फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी सांगितले. 

नीतू कपूर यांची भावनिक पोस्ट, ऋषी यांचा हसरा फोटो शेअर करत म्हणाल्या 'आमची कहाणी संपली...'

रक्ताच्या कर्करोगाशी दोन वर्षे झुंज दिल्यानंतर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (67) यांचे गुरुवारी (ता. 30) निधन झाले. न्यू यॉर्क शहरात उपचार घेतल्यानंतर ते 'शर्माजी नमकिन' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होते. परंतु, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चित्रीकरण थांबले. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेन्मेंटतर्फे निर्मिती असलेल्या या चित्रपटात ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते. त्यांचे अचानक निधन झाल्यामुळे हा चित्रपट अपूर्ण राहिला. 

हॉस्पिटलमधून लीक झाला ऋषी कपूर यांच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडिओ, आता होणार दोषींवर कारवाई

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषी कपूर यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण केले होते. त्यांचे फक्त काही भागांचे चित्रीकरण बाकी होते. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी हा चित्रपट पूर्ण करणार आहेत. या चित्रपटात ऋषी कपूर यांच्यासोबत जुही चावला मुख्य भूमिकेत आहे. जवळपास दहा वर्षांनंतर हे दोघे एकत्र काम करत होते. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर जुहीने या चित्रपटाच्या चित्रीकरणातील काही आठवणी ट्विटरवरून शेअर केल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: late actor rishi kapoor last film sharmaji namkeen release next year