शिवशाही नंतर STची शिवनेरी खासगीकरणाच्या मार्गावर? काय घडतंय नक्की तुम्हीच वाचा

शिवशाही नंतर STची शिवनेरी खासगीकरणाच्या मार्गावर? काय घडतंय नक्की तुम्हीच वाचा

मुंबई : एसटी महामंडळाने 2017 मध्ये शिवशाही प्रकल्पात खासगी वाहतुकदारांकडून बसेस एसटीच्या सेवेत आणल्या होत्या. मात्र, प्रवाशांनी नाकारल्याने अखेर खासगी वाहतुकदारांनी माघार घेऊन खासगी शिवशाहीची बस बंद केल्या आहे. त्यानंतरही एसटीच्या प्रतिष्ठित आरामदायक शिवनेरीच्या सेवेत हळूहळू खासगी बस वाहतुकदारांनी अतिक्रमण सुरू केले असून, तब्बल 11 खासगी बसेस शिवनेरी म्हणून धावत असल्याची माहिती उघड झाली आहे.

राज्यभरात एकूण 100 शिवनेरी बसेस आहे. त्यामध्ये मुंबई आणि ठाणे मिळून 37, पुणे 60, औरंगाबाद 3 असून यामध्ये 11 बसेस खाजगी वाहतुकदारांच्या आहे. नुकतेच 11 बसेस पैकी 3 बसेस नव्याने चालणात आणण्याचे परळ आगार व्यवस्थापकांना प्रभारी मुंबई विभाग नियंत्रकानी आदेश दिले आहे. ज्यामध्ये हर्ष लॉजीस्टिक कंपनीची एक बस बस दादर - पुणे स्टेशन चिंचवड मार्ग आणि ट्रॅव्हल टाईम रेंटल कार यांच्या दोन बसेस दादर - स्वारगेट या मार्गावर चालणात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

या 11 ही बसेसवर खासगी चालक ठेवण्यात आले असून, त्यांना कोणत्याही प्रकारचे शासकीय प्रशिक्षण नाही. त्यामुळे एसटी महामंडळाच्या सुरक्षित प्रवासाच्या हमीवर खासगी प्रवासी बस वाहतुकदारांकडून सर्रास आपल्या मनमर्जीत प्रवासी वाहतुक करत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे भविष्यातही शिवनेरी मध्ये आणखी खासगी बसेस वाढण्याची शक्यता असून, एसटीच्या शिवनेरीच्या निव्वळ नफ्यावर संक्रांत येण्याची शक्यता आहे.

खासगी शिवशाही प्रकल्प अपयशी
एसटीच्या सेवेत सुमारे 500 बसेस खासगी बस वाहतुकदारांच्या होत्या. त्यावर चालक सुद्धा खासगी असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्याशिवाय लालपरी बंद करून त्यांच्या मार्गावर शिवशाही सुरू केल्याने प्रवाशांनी शिवशाही प्रवास नाकारला होता. परिणामी प्रवासी संख्या घटली आणि खासगी शिवशाही वाहतुकदारांनी एसटीच्या सेवेतून माघार घेतली आहे.

एसटीला निव्वळ उत्पन्नाची गरज
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आधीच एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यातच प्रवासी संख्या घटल्याने एसटीचे निव्वळ उत्पन्नात तोटा वाढला आहे. अशा परिस्थिती महामंडळाने निव्वळ उत्पन्नासाठी प्रयत्न करणे गरजेचे असतांना खासगी बस वाहतुकदारांना अधिक संधी दिल्या जात आहे. त्यामुळे महामंडळाच्या निव्वळ उत्पन्नावर परिणाम होऊन एसटी आणखीनच तोट्यात जात आहे.

खाजगी गाड्या घ्यायला राज्य एसटी कामगार संघटनेने नेहमी विरोधच केलेला आहे. अर्थसंकल्पात एसटी ला गाड्या घेण्यासाठी वेगळी तरतूद होते. त्यातुन स्वमालकीच्या गाड्या घेणे आवश्यक आहे. गेल्या चार वर्षात लालपरीची खरेदी झालेली नाही. त्याची खरेदी होणे आवश्यक आहे.
- संदीप शिंदे,
अध्यक्ष, राज्य एसटी कामगार संघटना

खासगी बसेस आधीपासूनच शिवनेरी मध्ये सेवा देत आहे. लॉकडाऊनमुळे काही काळासाठी या बसेस बंद होत्या. त्यानंतर आता पुन्हा सुरू करण्यात आल्या आहे. 
- प्रशांत वास्कर,
प्रभारी विभाग नियंत्रक

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

latest marathi news After Shivshahi, Shivneri of ST on the path of privatization maharashtra live update

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com