esakal | बायकोला मालमत्ता समजनाऱ्यांनो सावधान! न्यायालय काय म्हणतंय ऐका

बोलून बातमी शोधा

बायकोला मालमत्ता समजनाऱ्यांनो सावधान! न्यायालय काय म्हणतंय ऐका}

बायको म्हणजे नवऱ्याची मालमत्ता आहे. हा पारंपरिक समज अजूनही अस्तित्वात आहे, या सामाजिक असमतोलामुळेच कौटुंबिक वाद निर्माण होत असतात, अशी नाराजी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे

बायकोला मालमत्ता समजनाऱ्यांनो सावधान! न्यायालय काय म्हणतंय ऐका
sakal_logo
By
सुनिता महामुणकर

मुंबई : बायको म्हणजे नवऱ्याची मालमत्ता आहे. हा पारंपरिक समज अजूनही अस्तित्वात आहे, या सामाजिक असमतोलामुळेच कौटुंबिक वाद निर्माण होत असतात, अशी नाराजी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. चहा दिला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात हातोडा मारणाऱ्या पतीची सक्तमजुरीची सजाही न्यायालयाने कायम ठेवली.

समाजात असलेल्या लिंगभेदाचे समज सामाजिक सांस्कृतिक असमतोल निर्माण करीत आहे, हे याचेच उदाहरण आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. पत्नीने घरातील सर्व कामे करायलाच हवीत ही मानसिकता यामधून व्यक्त होते. लग्न झाले की भावनिकरित्या काम करणाऱ्या पत्नीवर सामाजिक, कौटुंबिक बंधने लावली जातात. अशा परिस्थितीत पत्नी स्वतःला पतीच्या हवाली करत असते. मात्र त्यामुळे पतीची अशी मानसिकता होते कि तो पत्नीपेक्षा वरचढ आणि सरस असून पत्नी मात्र तो सांगेल ते ऐकणारी मालमत्ता आहे, मात्र घरातील प्रत्येक काम पत्नीने करायला हवे अशी अपेक्षा कोणी करता कामा नये, अशा शब्दांत न्या रेवती मोहिते डेरे यांनी सुनावले आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

आरोपी पती संतोष अटकर (35) सोलापूर जिल्ह्यातील असून पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. त्यावरून त्यांच्यामध्ये वादही होत होते. 19 डिसेंबर 2013 मध्ये पत्नी मनीषाने सकाळी चहा केला नव्हता आणि ती बाहेर जात होती. तेव्हा आरोपीने तीला चहा करायला सांगितले. याला तिने नकार दिला. त्यामुळे चिडून आरोपीने पत्नीला मागच्या बाजूने डोक्यावर हातोडा मारला. यामुळे रक्तबंबाळ झालेली पत्नी कोसळली. ते पाहून आरोपीने तीला पाण्याने स्वच्छ केले, जमिनीवर पडलेले रक्ताचे डाग साफ केले आणि मग तीला घेऊन रुग्णालयात गेला. हा सर्व प्रकार त्यांच्या सहा वर्षाच्या मुलीने पाहिला होता. पत्नीला रुग्णालयात उपचारानंतर ता. 25 रोजी म्रुत घोषित करण्यात आले. सन 2016 मध्ये स्थानिक सत्र न्यायालयाने मुलीची जबानी नामंजूर केली होती.  पोलिसांनी मुलीची जबानी उशिरा नोंदविली, असे न्यायालयाने म्हटले होते.
मात्र अन्य पुराव्यानुसार आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या आरोपामध्ये ( भादंवि 304 (2)) दहा वर्षे सक्तमजुरीची सजा सुनावली. याविरोधात त्याने उच्च न्यायालयात शिक्षा कमी करण्यासाठी अपील केले होते.

न्या डेरे यांनी मुलीची जबानी, काकांची जबानी आणि हातोड्यावर पडलेले रक्ताचे डाग या प्रमुख बाबी ग्राह्य धरल्या. मुलगी सहा वर्षाची होती, आणि आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर झालेला प्रकार तिच्यासाठी मानसिक धक्का देणारा होता. आरोपीने तातडीने पत्नीला रुग्णालयात नेले असते तर कदाचित तीला वेळेस उपचार मिळाले असते, मात्र त्याऐवजी तो पुरावे नष्ट करत राहिला असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. चहा देण्यासाठी नकार दिला हे काही हल्ला करण्यासाठी चिथावणी होऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले असून अपील नामंजूर केले.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

latest marathi news wife is the property of the husband mumbai high court express sadness crime live update