नौदलाच्या युद्धनौका तारागिरीचे लॉचिंग ११ सप्टेंबरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taragiri Warship

माझगाव डॉकच्या माध्यमातून तिसऱ्या युद्धनौकेच्या लॉंचिंग प्रकल्पाला येत्या ११ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.

नौदलाच्या युद्धनौका तारागिरीचे लॉचिंग ११ सप्टेंबरला

मुंबई - माझगाव डॉकच्या माध्यमातून तिसऱ्या युद्धनौकेच्या लॉंचिंग प्रकल्पाला येत्या ११ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. प्रोजेक्ट 17 अ अंतर्गत तारागिरी प्रकल्पाच्या लॉंचिंगच्या कामाला लवकरच सुरूवात होणे अपेक्षित आहे. तारागिरी प्रकल्पातील पोलादी कण्याचे (कील) चे काम हे १० सप्टेंबर २०२० मध्ये सुरू करण्यात आले होते. तर येत्या ऑगस्ट २०२५ मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करणे अपेक्षित आहे. याआधीच माझगाव डॉक लिमिटेडने उदयगिरी आणि सूरत या युद्धनौकांचे लॉंचिंग नुकतेच केले होते.

संपूर्ण तारागिरीचे काम हे इंटिग्रेटेड कंस्ट्रक्शन मेथडॉलॉजीने करण्यात येत आहे. त्यामध्ये ब्लॉकची निर्मिती विविध ठिकाणी करूनच माझगाव डॉक लिमिटेड येथे हे सुटे भाग जोडण्यात येणार आहेत. जवळपास ३५१० टनची युद्धनौका नौदलाला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. ब्युरो ऑफ नेव्हल डिझाईनच्या माध्यमातून या युद्धनौकेचे डिझाईन करण्यात आले आहे.

एमडीएलच्या माध्यमातून डिटेल डिझाईन आणि युद्धनौका बांधणीचे काम हे वॉरशीप ओव्हरसिईंग टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दोन गॅस टर्बाईन्स तसेच २ डिझेल इंजिनच्या माध्यमातून २८ नॉटिकल माईल्सचा वेग गाठणे हे युद्धनौकेला शक्य होणार आहे. यासाठी कार्बन मायक्रो अलॉय स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तसेच युद्धनौकेसाठीची शस्त्रे, सेन्सर, एडव्हान्स एक्शन इन्फॉर्मेशन सिस्टिमचा वापरही युद्धनौकेसाठी करण्यात आला आहे. सरफेस टू सरफेस अशा मिसाईल सिस्टिमचाही वापर युद्धनौकेसाठी करण्यात आला आहे. गनफायर सपोर्टही युद्धनौकेसाठी देण्यात आला आहे. तसेच रॉकेट लॉंचरचे फीचरही समाविष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :boatIndian Navy