गेल्या 10 वर्षांत तिसऱ्यांदा असं घडल्याने मुंबईकर घामाघूम...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

मुंबईत शनिवारी कमाल 36 अंश आणि किमान 29 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. शुक्रवारीही किमान तापमान 29 अंश सेल्सिअस होते. हे मे महिन्यातील गेल्या 10 वर्षांमधील तिसऱ्या क्रमांकाचे तापमान आहे. 

मुंबई : मुंबईत शनिवारी कमाल 36 अंश आणि किमान 29 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. शुक्रवारीही किमान तापमान 29 अंश सेल्सिअस होते. हे मे महिन्यातील गेल्या 10 वर्षांमधील तिसऱ्या क्रमांकाचे तापमान आहे. 

ही बातमी वाचली का? जाणून घ्या आडनावांतील गंमतीजमती

2010 आणि 2015 मध्ये मे महिन्यात किमान तापमान 29.7अंशांपर्यंत पोहोचले होते. 2016 मध्ये मे महिन्यातील सर्वाधिक किमान तापमान 29.2 अंश सेल्सिअस होते. कमाल तापमानातही वाढ झाली आहे.  शुक्रवारी कमाल तापमान सांताक्रूझ येथे 34.9अंश आणि कुलाबा येथे 35.2 अंश सेल्सिअस होते. शनिवारी कमाल तापमान सांताक्रूझ येथे 36 अंशांवर पोहोचले, तर कुलाबा येथे 35 अंश सेल्सिअसी नोंद झाली. 

ही बातमी वाचली का? तयारीला लागा! या दिवशी मुंबईत दाखल होणार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज...

सांताक्रूझ येथे 57 टक्के, तर कुलाबा येथे 76 टक्के आर्द्रता नोंदवण्यात आली. वाढत्या आर्द्रतेमुळे मान्सूनच्या आगमनाची चिन्हे मुंबईकरांना जाणवत आहेत. पुढील 24 तासांमध्ये हवामान असेच राहील, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर हळुहळू कमाल व किमान तापमानात थोडी घट होण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laziness of Mumbaikars temperature at 36 degrees Celsius