माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचं मुंबईत निधन

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचं मुंबईत निधन

मुंबई : माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचं निधन झालंय. मुंबईतल्या कोकिळाबेन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी प्राणज्योत मालवली आहे.

विष्णू सावरा हे भाजपचे नेते होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विष्णू सावरा यांनी सुरूवातीच्या काळात एका डेअरी प्रोजेक्टवर काम केलं त्यानंतर ते स्टेट बँकेत रूजू झाले. हे 1980 साली स्टेट बँकेच्या कामाचा राजीनामा देत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात वाहून घेतलं. तिथूनच त्यांची भाजपशी नाळ जुळली 1990, 1995, 1999, 2004, 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत सलग विजयी होत त्यांनी भाजपचा विश्वास सार्थकी लावला. भाजप-शिवसेना सरकारच्या काळात त्यांनी आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिलं.

विष्णू सावरा त्यांची अंतयात्रा उद्या गुरुवार दिनांक 10 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता वाडा येथील निवासस्थानातून निघणार आहे. 

leader of bharatiya janata party Vishnu Savara passed away in kokilaben hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com