केंद्राच्या कृषी कायद्याविषयी नेत्यांची भूमिका आडमुठी; रामदास आठवले यांची टीका 

सुजित गायकवाड
Tuesday, 19 January 2021

शेतकऱ्यांच्या नेत्यांची भूमिका आडमुठेपणाची आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली. 

नवी मुंबई : केंद्र सरकारने आणलेला नवा कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचाच आहे. या कायद्यात सुधारणा करण्याचीही केंद्र सरकारची तयारी आहे. तशी तयारी शेतकरी नेत्यांनी दाखवावी; मात्र शेतकरी नेते हा कायदाच मागे घेण्यावर अडून बसले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नेत्यांची भूमिका आडमुठेपणाची आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली. 

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज नवी मुंबईत आले होते. आठवले म्हणाले, नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरपीआयच्या वतीने 15 जागांची मागणी गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. त्यातील सात ते आठ जागा आरपीआयला मिळतील, अशी अपेक्षा आहे. मिळालेल्या जागा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. भाजपमधून काही नगरसेवक शिवसेनेत गेले असले तरी काही फरक पडणार नाही. नवी मुंबई महापालिकेमध्ये बीजेपी-आरपीआय युतीचाच महापौर बसेल. आरपीआयला उपमहापौरपद मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

गोस्वामी "चॅट'ची चौकशी व्हावी! 
अर्णब गोस्वामी यांच्या लिक झालेल्या कथित चॅटसंदर्भात आठवले यांनी अर्णबच्या चॅटची चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. एअर स्ट्राईक हा कॉन्फिडेंशल होता. त्यामुळे गोस्वामी यांनी असे चॅटिंग करणे चुकीचे असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. चॅट प्रकरण गंभीर असून, चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले.

Leaders role in the agricultural legislation is paramount Criticism of Ramdas Athavale

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leaders role in the agricultural legislation is paramount Criticism of Ramdas Athavale