
विरार : वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीने अल्पावधीतच पॉवरफुल्ल अधिकारी अशी ओळख प्राप्त करणारे वसई-विरार महानगरपालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांची अखेर बदली झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी त्यांची नियुक्ती झाली आहे.