
मुंबई : वैद्यकीय शिक्षण पद्धती ही किचकट होण्यापेक्षा सोपी व्हावी, यासाठी पालिकेच्या केईएम रुग्णालयातील प्राध्यापकांनी पुढाकार घेतला आहे. हसत-खेळत मन रमवत अभ्यास व्हावा आणि त्यातून ज्ञानाचे आदानप्रदान व्हावे, यासाठी केईएम रुग्णालयाच्या औषध विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. श्रद्धा मोरे यांनी काही खेळ स्वतः विकसित केले आहेत. विशेष म्हणजे या खेळांचे महत्त्व फक्त केईएम रुग्णालयापुरते मर्यादित न राहता सातासमुद्रापार पोहोचले आहे.