राज्यपालांच्या पत्रानंतर राज्य सरकार सुसाट, विधानसभा अध्यक्षपदाबाबत आज बैठक

पूजा विचारे
Thursday, 18 February 2021

नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला थेट पत्र लिहिलं आहे. 

मुंबई: आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक मुंबई विधान भवन येथे होणार आहे. दरम्यान राज्यात पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार याच्यात वाद रंगण्याची शक्यता आहे.  विद्यमान महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला थेट पत्र लिहिलं आहे. 

या पत्रात राज्यपालांनी राज्य सरकारला थेट सवाल विचारलेत. नवीन अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार? असा थेट सवाल राज्यपालांनी राज्य सरकारला विचारला आहे. दरम्यान राज्यपालांनी पत्र व्यवहार केल्यानं आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होत आहे. या बैठकीत विधानसभा अध्यक्षपद आणि एक मार्चपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आज होणाऱ्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यासह सर्व प्रमुख पक्षाचे नेते उपस्थित असतील. 

हेही वाचा- टकेच्या भीतीने एकनाथ खडसेंची पुन्हा उच्च न्यायालयात धाव

राज्यपाल यांनी पत्र लिहून राज्य सरकारला रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत विचारलं आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधक दोघेही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकावर प्राथमिक चर्चा करतील. त्यानंतर त्यासंदर्भातली माहिती राज्य सरकार राज्यपालांना कळवेल, असं समजतंय. 

Legislative Affairs Advisory Committee meeting today Governor letter state government


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Legislative Affairs Advisory Committee meeting today Governor letter state government