... म्हणून त्यांनी बिबट्याला जिवंत जाळून हत्या केली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

  • कर्जतमध्ये बिबट्याची हत्या 
  • नखे आणि दातांच्या तस्करीचा प्रयत्न; आरोपीस अटक 

कर्जत: तालुक्‍यातील माले येथील जंगलात बिबट्याची हत्या करून त्याला जाळण्यात आले. त्याचे नखे आणि दात काढण्यात आली असल्याने ही हत्या तस्करीसाठी कारण्यात आल्याचा अंदाज अहो. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी आरोपीला अटक केले आहे . 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दोन दिवसांपूर्वी कर्जत वनविभागाचे वन रक्षक वन क्षेत्रात गस्त घालत होते. त्या वेळेस त्यांना जंगलात एका ठिकाणी खडकाळ भागावर काही जाळलेले आणि राख दिसून आली. त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता बिबट्याला ठार मारून जाळले असल्याचे लक्षात आले. त्याची नखे आणि दात गायब होते. 
यासंदर्भात तपास करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. या वेळी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी माले परिसरात एका व्यक्तीला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता बिबट्याची 17 नखे 4 दात सापडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

अधिक बातम्यांसाठी "ईपेपर" वाचा।

आरोपीस वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 9, 39,48, 50, 51 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत अलिबाग उपवनसंरक्षक मनीष कुमार, कर्जत सहाय्यक वनसंरक्षक किरण जगताप, पनवेल सहाय्यक वनसंरक्षक नंदकिशोर कुपटे आदी अधिकारी सहभागी झाले होते. ते अधिक तपास करीत आहेत . 

LEOPARD murder in Karjat


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LEOPARD murder in Karjat