झारीतले शुक्राचार्य कोण? मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांबाबत यशवंत जाधवांचा संताप

समीर सुर्वे
Wednesday, 13 January 2021

मुंबईतील विकासाचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. हे प्रकल्प कोणाच्या आदेशाने रोखून धरले जात आहे. त्या झारीतील शुक्राचारांची नावे उघड झाली पाहिजे अशा शब्दात आज स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी संताप व्यक्त केला.

मुंबई : मे महिन्यापासून मुंबईतील विविध रखडलेल्या प्रकल्पांसाठी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहीली. मात्र, या पत्रांवर कार्यवाही करणे सोडा पण उत्तरही आले नाही. मुंबईतील विकासाचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. हे प्रकल्प कोणाच्या आदेशाने रोखून धरले जात आहे. त्या झारीतील शुक्राचारांची नावे उघड झाली पाहिजे अशा शब्दात आज स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी संताप व्यक्त केला.

सफाई कामगारांच्या घरांच्या पुनर्विकासाची आश्रय योजना,मलजल प्रक्रिया केंद्र,जागेश्‍वरी विक्रोळी जोड रस्ता रुंदीकरण अशा विविध प्रकल्पांबाबत मे 2020 पासून आयुक्त चहल यांना 9 पत्र लिहीली आहेत.मात्र,त्यातील ,,,,काही पत्राला उत्तर आले नाही.आमदार,खासदारांनी पत्र लिहील्यावर त्यावर तत्काळ कारवाई केली जाते.आमदार खासदार मंत्री झाले आताही मुंबई महापालिकेत लक्ष दिले जाते.अशा शब्दात जाधव यांनी काही स्वपक्षीयांनाही टोला लगावला.मलजल प्रक्रिया केंद्रात निवीदा प्रसिध्द झाल्यावर रोजच्या रोज त्यात बदल होता.हे काेणाच्या मागणीवर होतं.कोणत्या कंत्राटदारासाठी हे प्रयत्न सुरु आहेत.असा गंभिर प्रश्‍नही जाधव यांनी उपस्थीत केला.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

सांडपाण्यावर योग्य पध्दतीने प्रक्रिया होत नसल्याने राष्ट्रीय हरीत लवादाने दंड थोटावला आहे.दर महिन्याला 10 लाख रुपयांचा दंड महापालिकेला भरावा लागत आहे.तरीही प्रशासन गांभिर्याने विचार करत नाही.सहा वर्षात या प्रकल्पांचे काम सुरु का नाही झाले.आश्रय योजनाही ठराविक विभागात राबवली जात आहे.या मागचा हेतू काय असेही प्रश्‍न त्यांनी उपस्थीत केले.याबाबत आयुक्तांनी माहिती देणे गरजेचे आहे.असेही त्यांनी सांगितले.

Letter to the Commissioner regarding pending projects in Mumbai

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter to the Commissioner regarding pending projects in Mumbai