esakal | कोरोना व्हायरसप्रमाणे मराठा आरक्षण अल्ट्रा व्हायरस - गुणरत्ने सदावर्ते

बोलून बातमी शोधा

sadavarte

कोरोना व्हायरसप्रमाणे मराठा आरक्षण अल्ट्रा व्हायरस - गुणरत्ने सदावर्ते

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मराठा आरक्षणाविरोधात (Maratha reservation)भूमिका घेणारे अ‍ॅड गुणरत्ने सदावर्ते (Gunratan Sadavarte)यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. मी आनंदाने या निकालाचे स्वागत करतो. "महाराष्ट्रातील खुल्या वर्गातील गुणवंतांनी, ज्या प्रकारे माझं, माझ्या कुटुंबाचं समर्थन केलं. माझ्यामागे शक्ती म्हणून उभे राहिले. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो" असे सदावर्ते निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले. (Like corona virus Maratha reservation is ultra virus Gunratan Sadavarte)

"मराठा समाजाचे ५२ मार्चे झाले. त्यासाठी BMW मधुन गर्दी जमवली. देवेंद्र फडणवीस यांना वेठीस धरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणला" असा दावा गुणरत्ने सदावर्ते यांनी केला. "ही खुल्या गणुवंतांची संविधानासोबतची लढाई होती. सर्वोच्च न्यायालयाने कोरोना व्हायरसप्रमाणे मराठा आरक्षणाला अल्ट्रा व्हायरस घोषित केले" असे विधान गुणरत्ने सदावर्ते यांनी केला.

हेही वाचा: 'मराठा समाजासाठी हा दुर्देवी, भयानक क्षण'

"गायकवाड समितीचा अहवाल रद्द केला. इंद्रा सहानी खटला सात न्यायमुर्तींच्या घटनापीठाकडे पाठण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मराठा आरक्षण मागास ठरत नाही" असे सर्वोच्च न्यायालयाने डंके की चोट पर सांगितल्याचा दावा गुणरत्ने सदावर्ते यांनी केला.