भाजप-सेनेला पाठिंबा देणाऱ्या पक्षाने केली पाहिली यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

आज श्रमजीवी संघटनेचे सचिव बाळाराम भोईर यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 

विरार  : सेना-भाजप युतीला सातत्याने पाठिंबा देणाऱ्या श्रमजीवी संघटनेने यावेळी कोणालाही पाठिंबा न देता स्वबळाची नारा दिला आहे. ठाणे आणि पालघर जिल्यात त्यांनी तशी मोर्चेबांधणी केली असून, आज श्रमजीवी संघटनेचे सचिव बाळाराम भोईर यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 

दरम्यान, यात वसईमधून डोमनिका डाबरे तर नालासोपारा येथून प्रवीण पाटील यांची नावे घोषित करण्यात आली आहेत. श्रमजीवी संघटना लढविणार असलेल्या ठाणे आणि पालघरमधील उमेदवारांची नवे आज जाहीर करण्यात आली आहेत.

दरम्यान, यात वसईमधून डोमनिका डाबरे, नालासोपारातून प्रवीण पाटील, भाेईसरमधून रामचंद्र रोज, पालघरमधून वैशाली बारगा, विक्रमगडमधून यशवंत भोये, भिवंडी ग्रामीणमधून गणपत हिलम, भिवंडी पश्चिममधून यशवंत भोईर, भिवंडी पूर्वमधून हिरामण गुलवी, डहाणूमधून हनिफ सुतार, शहापूरमधून राजेंद्र म्हसकर, आणि ओवळा माजीवडासाठी सुलतान  पटेल यांच्या नावांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A list of the party which supports the BJP-Sena has been released