विषय राजकीय नाही म्हणत, कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास स्थानिक रहिवाशांचा विरोध

विषय राजकीय नाही म्हणत, कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास स्थानिक रहिवाशांचा विरोध

मुंबई : मुंबईतील कुलाब्यात एम जी रोडवरील डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनेतर्फे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे. दरम्यान काही रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत या स्थापनेला विरोध दर्शविला आहे. सार्वजनिक रस्त्यावर पुतळे बसवले जाऊ नयेत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय, त्याचाच हवाला इथल्या काही नागरिकांनी दिलेला आहे.   

याबाबत बोलताना आपली मुंबई या संस्थेचे अध्यक्ष आय पी राव म्हणतात की, लोकांच्या मते हा राजकीय विषय नसून सुरक्षिततेचा मुद्दा आहे. जेंव्हा महत्त्वाच्या व्यक्तींच्या सन्मानासाठी त्यांना हार चढवले जातात, तेंव्हा रस्ते बंद ठेवायला लागतात. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीची प्रतिमा स्थापित केल्यानंतर तिथे अनेक नागरिक सेल्फी घेण्यासाठी देखील येतात. त्यामुळे रहदारीची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. या रस्त्यावर जागा कमी असल्याने कुलाब्यातील काही स्थानिकांचा या स्थापानेला विरोध आहे.  

राव यांनी याबाबत बोलताना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आठवण करून दिली. केरळ सरकारला केरळ विधानसभेचे माजी उपसभापती दिवंगत एन सुंदरन नादर यांचा पुतळा वाहतूक बेटावर बसवायचा होता. त्यानंतर ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. तेंव्हा सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला होता तो देशातील सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होतो. मुंबई (शहर) कलेक्टर राजीव निवतकर यांनी याबाबत माहिती घेणार असल्याचं म्हटलंय. 

बाळासाहेब ठाकरे यांचं मुंबईसाठीचं बलिदान मोठं आहे, त्यामुळे प्रत्येकालाच त्यांच्याविषयी आदर आहे. याआधी ठरवण्यात आलेली जागा लहान होती, मात्र आताची जागा बऱ्यापैकी मोठी आहे. ज्यामुळे नागरिकांना इथे येऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करता येऊ शकेल. याबाबतच्या सर्व परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे मुंबईकर या प्रतिमा स्थापनेस विरोध करणार नाहीत. ज्यांच्याकडून या प्रतिमेस विरोध होतो आहे, तो केवळ राजकारणासाठी केला जातोय असंही शिवसेनेकडून बोलण्यात येतंय.  

मुंबई हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटी (एमएचसीसी) आणि इतर महत्त्वाच्या विभागांकडून सर्व परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत असं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

दरम्यान, याबाबत बोलताना कुलाब्यातील भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर म्हणाले की, पुतळा नियमानुसार स्थापित केला गेला पाहिजे. यामुळे कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन केले जाऊ नये.

local residents of colaba oppose Balasaheb Thackerays statue at Colaba

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com