
मुंबई: लोकल सेवा सर्वांसाठी पुढल्या वर्षातच सुरु होणार आहे. नाताळा, नववर्ष या काळात कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन लोकल सेवेबाबत विचार करण्यात येईल, असे संकेत महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले. त्याचबरोबर नाताळा आणि नववर्षासाठीही महापालिकेकडून नियमावली तयार केली जाण्याची शक्यता आहे.
मुंबईतील कोविड नियंत्रणात आला आहे. डिसेंबर महिन्यापासून चाचण्या झालेल्या व्यक्तींपैकी 5 टक्के रुग्णांना कोविडची बाधा असल्याचे आढळत आहे. तरीही कोविड पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे 20 डिसेंबरपर्यंत कोविड परिस्थीतीचा अंदाज घेण्यात येणार आहे. तसेच नाताळा आणि नववर्षाचा विचार करुन लोकल सुरु करण्याबाबत विचार करु असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.
सामान्यांसाठी 15 डिसेंबरनंतर लोकल सर्वासामान्यांना सुरु होण्याची शक्यता होती. मात्र, आता नाताळनंतर लोकल सुरु करण्याची शिफारस रेल्वे प्रशासनाला करण्याचा विचार महापालिका करत आहे.
यावर्षी कोविडमुळे सर्वच सण साजरे करण्यासाठी महापालिकेने नियमावली तयार केली होती. त्याच धर्तीवर नाताळा आणि नववर्ष साजरा करण्याबाबत नियमावली तयार केली जाणाची शक्यता आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुंबईतील कोविड आटोक्यात आला आहे. मात्र,संपलेला नाही. हे लक्षात घेऊन लोकल सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल. त्याच बरोबर यंदाच्या वर्षीचा कोणाताही सण दरवर्षी सारखा नाही. त्यामुळे नाताळा आणि नववर्षाबाबतही विचार करण्यात येईल. 20 डिसेंबरपर्यंतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.
इक्बाल सिंह चहल, मुंबई महापालिका आयुक्त
मुंबईत मे जून महिन्यात चाचणी झालेल्या पैकी 38 टक्के रुग्ण आढळत होते. मात्र,आता 5 डिसेंबरपासून हे प्रमाण 5 टक्क्यांवर आले आहे. दिवाळीनंतर कोविड वाढेल असा अंदाज असताना कोविडवर नियंत्रण आले आहे. मात्र,कोविड अद्याप संपलेला नाही, असे आयुक्तांनी सांगितले.
तारीख | पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण |
5 डिसेंबर | 5 टक्के |
6 डिसेंबर | 5 टक्के |
7 डिसेंबर | 4 टक्के |
8 डिसेंबर | 5 टक्के |
9 डिसेंबर | 5 टक्के |
(संपादन- पूजा विचारे)
local services Start new year after considered covid situation Iqbal Singh Chahal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.