Vasai Virar Local Close : वसई विरार दरम्यान लोकल बंद; ट्रॅक्टरवाल्यांचा भाव वधारला, तालुक्यातील अनेक ठिकाणची वीज गायब

वसई-विरार मध्ये गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा लागोपाठ दुसऱ्या दिवशीही पश्चिम रेल्वेला फटका बसला.
Vasai Virar Local Railway Close by Heavy Rain

Vasai Virar Local Railway Close by Heavy Rain

sakal

Updated on

विरार - वसई विरार मध्ये गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा लागोपाठ दुसऱ्या दिवशीही पश्चिम रेल्वेला फटका बसला असून ,वसई ते विरार दरम्यानची लोकसेवा पुन्हा ठप्प झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला वसई ते विरार दरम्यान जाण्यासाठी ट्रॅक्टरवाले ५०० रुपये आकारत असल्याने प्रवाश्याना दोन्ही बाजूने भुर्दड सोसावा लागत आहे. तीन दिवसापासून शहरात अनेक ठिकाणी पाणी भरल्याने वीज पुरवठा आणि इंटरनेट सेवा बंद झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com