मुंबईकरांनो ऑक्टोबरमध्ये लोकल सर्वांसाठी सुरू होणार? आदित्य ठाकरे यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

तुषार सोनवणे
Tuesday, 29 September 2020

पालक मंत्री अदित्य ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्येही लोकल सुरू करण्यासंदर्भात महत्वपुर्ण विधान केले आहे.

मुंबई - उपनगरी रेल्वेवरील भार कमी करायचा असेल तर कार्यालयांच्या वेळा भिन्न असण्याची गरज आहे तसेच त्यांच्या सुटीतही लवचिकता ठेवण्याची आवश्यकता आहे. आता किमान कोरोनाच्या आक्रमणामुळे मुंबई महापालिकेने याबाबतची चाचपणी जुलै महिण्यात सुरू केली होती. आता पालक मंत्री अदित्य ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्येही या संदर्भात महत्वपुर्ण विधान केले आहे.

अदित्य ठाकरे यांनी संबधित वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की,  मुंबईतील कोरोनाची परिस्थिती आणि लोकसंख्येचा विचार करता. कार्यालयीन वेळांमध्ये बदल करण्याचा विचार आहे. कार्यलयीन कामासाठी पुर्ण 24 तासाचा वापर करता येतो का. त्यामुळे लोकल सेवेवर ताण येणार नाही. यावर विचार सुरू आहे. तसे झाल्यास ऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरू होऊ शकते. याबाबतीत उद्योजकांशीही संवाद साधणार आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी उपनगरी रेल्वेची वाहतूक सुरु झाली, पण त्यातील वाढती गर्दी चिंतेची बाब झाली आहे. कोरोना रोखण्यासाठी सुरक्षित अंतराची गरज असते. मात्र सकाळच्या गर्दीच्यावेळी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि संध्याकाळी मुंबईहून जाणाऱ्या उपनगरी रेल्वेत हे अशक्यच असते. आता पूर्ण कर्मचारी कार्यालयात नसतानाही हा प्रश्न गंभीर होत असल्याचे दिसत आहे. आता आपल्या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा विचार प्रशासन करीत आहे.  बस आणि इतर वाहतूक सेवेवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुले लोकांचे हाल होत आहेत. मनसेने देखील लोकल सुरू करावी याबाबत आंदोलन सुरू केले आहे. नागरिकांमध्येही लोकल सुरू होत असल्यांने असंतोष वाढत आहे. परंतु सर्वांसाठी लोकल सुरू केल्यास, कोरोनाची संख्या झपाट्याने वाढू शकते अशी दाट शंका तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: local trains may starts for all in october aditya thackeray