लॉकडाऊनमुळे फटाका मार्केटवर परिणाम, सुमारे एक हजार कामगारांच्या रोजगारावर गदा

लॉकडाऊनमुळे फटाका मार्केटवर परिणाम, सुमारे एक हजार कामगारांच्या रोजगारावर गदा

मुंबईः  दिवाळीचा सण म्हटलं की स्वादिष्ट खमंग फाराळांची रेलचेल, विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी असा काहीसे वातावरण दिवाळी सणात सर्वत्र दिसून येत असते. त्यात फटाक्यांसाठी सर्वदूर प्रसिध्द असलेल्या ठाणे पूर्वेतील कोपरी फटाका मार्केटमध्ये तर दहा दिवस आधीपासूनच फटाके घेण्यासाठी होणारी गर्दी विविध नवनवीन फटाके बाजारत येणाऱ्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या फटका मार्केटवर देखील त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी दिवाळीच्या दहा ते पंधरा दिवसापासून फटाके खरेदीसाठी जिल्ह्यातील विविध भागातून ग्राहक या ठिकाणी फटके घेण्यासाठी येत असतात. मात्र, यंदा चित पाखरू देखील या मार्केटमध्ये फिरकत नसल्यामुळे फटाका व्यापाऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

दिवाळीच्या काळात फटाका दुकानात कामासाठी स्थानिक तरुणांपासून ते परराज्यातून येणाऱ्या कामगारांचा रोजगार देखील बुडाला असल्याची माहिती फटाका व्यापाऱ्यांकडून देण्यात आली. 

यंदा सर्वत्र कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. त्यात आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासन अहोरात्र झटत आहे. त्यात या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळात शासनाच्यावतीने टाळेबंदी देखील करण्यात आली होती. या काळात गणेशोत्सव, नवरात्री यांसारखे उत्सव सध्या पद्धतीने साजरे करण्याबरोबरच नियमांचे पालन करत साजरे करण्याचे आव्हान शासनाकडून करण्यात आले होते. त्यामुळे यंदा गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवात कोणताही जल्लोष ढोल तशा विनाच साजरा करण्यात आला. त्यात सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या आटोक्यात येऊन ऑक्टोबर महिन्यात त्यात मोठ्या प्रमाणत घट असल्याचे दिसून येत आहे. त्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेलेल्या असताना, दुसरीकडे दिवाळी सणात फटाक्यांच्या आतिषबाजीची चमक यंदा फिकी पडली आहे.

दरवर्षी दिवाळी सणाच्या दहा ते पंधरा दिवसाआधी पासून फटाक्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोपरी होलसेल फटका मार्केटमध्ये ठाणे जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील ग्राहक फटके घेण्यासाठी येत असतात. या ठिकाणी चार मोठी होलसेल दुकाने आहेत. या दुकानांवर फटके घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेता, दुकानांमध्ये कामांसाठी फटाक्यांची जाण असलेल्या तरुणांन 10 ते 15 दिवस काम करून त्याचा मोबदला मिळत असे. ग्राहकांनी घेतलेल्या फटाक्यांचे बिल झाल्यानंतर ते पिशवीत भरून देण्यासाठी आणि फटाक्यांचे बॉक्स उचलण्यासाठी परराज्यातून कामगार या ठिकाणी कामासाठी येत असतात. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटके वाजविण्यास बंदी घालण्यात यावी अशी ओरड होत असल्याने आणि फटाके वाजवण्यावर बंदी आली या द्विधा मनस्थित ग्राहक असल्याने दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, देखील ग्राहक फटके घेण्यासाठी जात नसल्याने त्याचा फटका फटाका व्यापाऱ्याला बसला आहे.  सुमारे 800 ते एक हजार लोकांचे रोजगार देखील बुडाले असल्याची माहिती फटका विक्रेते पंकज जोष्टे यांनी दिली. 

दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील लहानमुले फटाके घेण्यासाठी येताहेत. मात्र, यावेळी कमी आवाजाचे आणि कमी धुराच्या फटाक्यांची मागणी अधिक वाढली आहे. त्यात फटाक्यांवर बंदी घालण्याची होत असलेल्या मागणीमुळे लोकांमध्ये देखील फटके खरेदी करण्याबाबत संभ्रम होता. त्यामुळे फटाके विक्रीवर त्याचा परिणाम झाला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी फटाके वाजवा पण त्यापासून कोणाला त्रास होणार नाही. याची दक्षता घ्या असे आवाहन केले आहे. त्यामुळे आता, फटाके खरेदीवर त्याचा परिणाम होऊन गर्दी वाढण्याची शक्यता आहे. 
सतीश (बंडूशेठ) पिंगळे, कृष्णा स्टोर्स.

-------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Lockdown affects firecracker market hammers employment of around one thousand workers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com