esakal | झोपडपट्टीमध्ये कोरोना वेगाने फैलावणार?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

झोपडपट्टी परिसरामध्ये या लॉकडाऊनचे तीन तेरा वाजले आहेत. 

झोपडपट्टीमध्ये कोरोना वेगाने फैलावणार?

sakal_logo
By
शरद वागदरे

वाशी : कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात हलकल्लोळ उडवून दिला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले असून त्यांचा आकाडा 89 च्या वर गेला आहे. त्यामुळे सरकारनेही याची धास्ती घेतली असून, स्थानिक प्रशासनामार्फत कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. हा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 मार्चपर्यंत अत्यावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र झोपडपट्टी परिसरामध्ये या लॉकडाऊनचे तीन तेरा वाजले आहेत. 


नवी मुंबई पालिका क्षेत्रामध्ये अद्यापपर्यंत चार रुग्ण हे कोरोनाचे आढळले आहेत. हे चारही रुग्ण परदेशामधून आलेले आहेत; त्यांना कस्तुरबा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

हे ही महत्वाचे...महाराष्ट्रात संचारबंदी लागू 

रविवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन केलेले असतानाही झोपडपट्टी परिसरामध्ये लॉकडाऊनला केराची टोपली दाखवण्यात येत आहे. पालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी परिसर आहे. एमआयडीसीच्या जागेवर वसवण्यात आलेला परिसर हा झोपडपट्टी भाग आहे. या झोपडपट्टी परिसरातील यादवनगर, तुर्भे या परिसरात परप्रांतीय हे मोठ्या प्रमाणात राहतात. मात्र या झोपडपट्टीतील रहिवाशांना कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाबाबत गांभीर्य नाही.

हे ही महत्वाचे...आम्हीही माणसे आहोत 
 

झोपडपट्टीमध्ये घोळक्‍याने, तसेच नाका नाक्‍यावर, चौकात बिनधास्तपणे अनेक जण गप्पा मारत उभे राहत आहे. त्यातच तोंडाला मास्क लाऊन फिरणे अथवा वांरवार हात धुणे याकडेही लक्ष देण्यात येत नाही. त्यामुळे झोपडपट्टीमध्ये कोरोना विषाणूचा रुग्ण आढळल्यास झपाट्याने त्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. नवी मुंबई शहराची लोकसंख्या पंधरा लाख असून, यातील पाच लाख लोकसंख्या ही झोपडपट्टी परिसरात राहत आहे. त्यामुळे या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. 
 

loading image