esakal | गटारी असूनही मटनाच्या विक्रीत मोठी घट वाचा 'हे' आहे कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

गटारी असूनही मटनाच्या विक्रीत मोठी घट वाचा 'हे' आहे कारण...

 

  • रायगड जिल्ह्यात मटण विक्रीत घट
  • लॉकडाऊनचा फटका; गावोगावी बोकड कापण्याला पसंती

गटारी असूनही मटनाच्या विक्रीत मोठी घट वाचा 'हे' आहे कारण...

sakal_logo
By
प्रमोद जाधव - (बातमीदार-अलिबाग)


अलिबाग : गटारीनिमित्त मटण, चिकन खाणाऱ्यांनी जिल्ह्यातील मटण, चिकनच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली; परंतु या लॉकडाऊनमध्ये गावोगावी ग्रामस्थांनी एकत्र येऊन बोकड कापले. त्यामुळे या वर्षी सुमारे 30 टक्के विक्रीत घट झाल्याचे अलिबाग तालुका बोकड मटण विक्री संस्थाचे अध्यक्ष महेंद्र नखाते यांनी सांगितले. गेल्या वर्षी सुमारे 25 हजार बोकडांची कत्तल झाली होती. या वर्षी अंदाजे 20 हजारांच्या आसपास बोकडांची कत्तल झाल्याने विक्रीवर त्याचा परिणाम झाल्याचे सांगण्यात आले आहे.

पनवेलमधल्या 'त्या' घटनेनंतर ठाकरे सरकारला जाग, घेतला मोठा निर्णय

रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यामध्ये मटण, चिकन विक्रीला बंदी घातली होती. अलिबाग तालुका बोकड, मटण विक्री संस्थेच्या मागणीला दुजोरा देत जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन शिथिल करून किराणा दुकानांसह भाजीपाला, फळे, मटण, चिकन विक्रीला परवानगी दिली. त्यामुळे रविवारी गटारीनिमित्त मटण खवय्यांनी दुकानांमध्ये सकाळी सहा वाजल्यापासून गर्दी करण्यास सुरुवात केली. मटण खवय्यांची दुकानांसमोर रांग लागली होती. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले होते.

सुशांत राजपूतच्या जवळच्या मैत्रिणीला बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी...

11 वाजेपर्यंत मटण, चिकन विक्रीला परवानगी दिली होती. काही ठिकाणी 11.30 वाजलेतरीही विक्री सुरूच होती. गेल्या वर्षी गटारीमध्ये मिक्स 540 तर प्युवर मटण 580 रुपये होते. सुमारे 30 हजारच्या आसपास बोकडांची कत्तल करण्यात आली होती. या वर्षी लॉकडाऊनमुळे जादा पैसे भरून स्थानिकांकडून बोकड खरेदी करण्याची वेळ आली. त्यामुळे मटणाचे दरही 100 ते 140 रुपयांनी वाढले. या वर्षी मिक्स 640 रुपये तर पिव्हर 720 रुपये असतानाही ग्राहकांनी मटण खरेदी केले. या वर्षी सुमारे 30 टक्के विक्रीत घट झाल्याचे मटण विक्रेते महेंद्र नखाते यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे अनेक गावांतील नागरिक बाहेर पडले नाहीत. त्यांनी एकत्र येऊन बोकड गावातच कापून वाट्याच्या अधारे मटण घेतले. त्यामुळे ग्राहकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे नखाते म्हणाले.

विधी शाखेच्या परीक्षेचा निर्णय बार कौंसिंलच्या कोर्टात; उच्च न्यायालयाने दिले हे आदेश
 

छुप्या दारू विक्रीला उधाण
अलिबाग  : लॉकडाऊनमध्ये जिल्हा प्रशासनाने दारू विक्रीला बंदी घातली आहे. फक्त पार्सल सेवा देण्यास मुभा देण्यात आली; मात्र गटारीनिमित्त रविवारी बंद असलेल्या दारूच्या दुकानांसमोर काही मद्यपींनी गर्दी केली होती. दारू विक्रेत्यांनी दुकानांचे शटर अर्धेच उघडून छुप्या पद्धतीने दिवसाढवळ्या दारू विक्री सुरू ठेवली होती. नाक्यानाक्यांवर पोलिसांचा बंदोबस्त असतानाही पोलिसांना न घाबरता खुलेआम दारू विक्री सुरूच ठेवली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन या दारू विक्रेत्यांकडून होत असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत होते. या दारूच्या दुकानांमध्ये मद्यपींची गर्दी वाढल्याने सामाजिक अंतराचा फज्जा उडाला असल्याचे दिसून आले आहे.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top