Amit Shah : सर्व विरोधी पक्ष आपली घराणेशाही जपण्यात आणि सत्तेत येण्याची धडपड करण्यात गुंतले आहेत

सर्व विरोधी पक्ष आपली घराणेशाही जपण्यात आणि सत्तेत येण्याची धडपड करण्यात गुंतले आहेत,' असे प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी वसईत केले.
amit shah
amit shahsakal

विरार - 'देश सांभाळण्याची धमक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्येच आहे. भाजप हा पक्ष देशाची निःस्वार्थ सेवा करतोय, बाकी सर्व विरोधी पक्ष आपली घराणेशाही जपण्यात आणि सत्तेत येण्याची धडपड करण्यात गुंतले आहेत,' असे प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी वसईत केले.

भाजपाचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रचारासाठी शहा वसईत सोमवारी सायंकाळी आले होते. सनसिटीच्या मैदानात त्यांची जाहीर सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विवेक पंडित, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. राजेंद्र गावित यावेळी उपस्थित होते. यावेळी शहा यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली.

एकनाथ शिंदे हे खर्‍या शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे हे फक्त सत्तेसाठी कसाबला पाठीशी घालणार्‍यांच्या मांडीवर बसले आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत.

पाकिस्तानी झेंडा हाती घेणारे पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊ शकत नाहीत.

सत्तेवर आल्यावर तिहेरी तलाक परत आणणार, ३७० कलम पुन्हा लावणार,अशी भाषा करीत आहेत. नाना पटोलेंना धर्म समजत नाही. ते राम मंदिराचे शुध्दीकरण करण्याची भाषा करत आहेत. देशाची चिंता महाविकास आघाडीला नाही, सोनिया गांधी राहुलला प्रधानमंत्री बनवण्याची स्वप्ने पहात आहेत.

तर शरद पवार-सुप्रिया सुळेंना, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला, ममता-बिजुला आणि लालु-मुलाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी धडपडत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेत ११ व्या क्रमांकावर असलेल्या आपल्या देशाला प्रधानमंत्री झाल्यावर नरेंद्र मोदींनी ७ व्या क्रमांकावर आणून ठेवले आहे.

ते तिसर्‍यांदा प्रधानमंत्री झाल्यावर आपला देश अर्थव्यवस्थेत तिसर्‍या क्रमांकावर असेल, अशी आशा व्यक्त करतानाच शहा यांनी पालघरमधील प्रश्नावर भाष्य केले. वसईकरांना सूर्या योजनेतून ४०० द.ल.ली. पाणी देण्याचे काम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पालघरमधील २६ मच्छिमारांची पाकिस्तानातून सुटका, रोरो सेवा, गॅस पाईपलाईन ही कामे भाजपाने केली आहेत,असा दावा त्यांनी आपल्या भाषणातून केला.

तर एकनाथ शिंदे यांनी शहा यांची प्रशंसा केली. अनहोनी को होनी करना उनकी खासीयत है, इसका गवाह मै हू,हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे शहा यांचे नेतृत्व आहे. आमचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा हे हाडाचे (ऑर्थो.) डॉक्टर आणि हाडाचे कार्यकर्ते आहेत. ते विरोधकांची हड्डी-फसली एक करतील.

त्यांचा चांगला 'इलाज,' करतील. मी डॉक्टर नसलो तरी दोन वर्षापूर्वी एक सर्जरी केली होती. त्यावेळी अमित शहा माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आता आपली पाळी आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना प्रचारात उतरवणारी ’मशाल’ कायमची विझवा, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com