Lonavla News : तुम्हालाही काढायची आहे का लोणावळ्याला ट्रिप? तर नक्की वाचा 'ही' बातमी

'हौशी' पर्यटक आपला जीव धोक्यात घालतात.
lonavla
lonavlasakal

Lonavla News : पावसाळा असो, उन्हाळा असो कि हिवाळा महाराष्ट्रातील लोक पर्यटनासाठी लोणावळ्यात नेहमी जात असतात. यामुळेच कि काय लोणावळ्याला पर्यटक पंढरी म्हटलं जात. यासाठी दरवर्षी नागरिक पर्यटनासाठी येतात.

लोणावळ्यातील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक इथे यायला उत्सुक असतात. मात्र काही नागरिक हे केवळ पर्यटक नसतात तर ते 'हौशी' पर्यटक असतात आणि ते लोक आपला जीव धोक्यात घालतात.

lonavla
Pune Polution : पुण्यातील प्रदूषणात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाढ; खासगी वाहनांची वाढती संख्या अन्...

पावसाळा आला की, पुणेकरांचे आणि मुंबईकरांचे सहलीचे प्लॅन असतातच अश्यावेळी लोणावळ्याच्या भुशी डॅमवर मोट्या प्रमाणावर गर्दी होत असते. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने नागरिक येत असतात. मात्र काही हौशी लोक असे असतात जे जीवावर बेतणारे खेळ खेळतात.

lonavla
Mumbai On High Alert : पुण्यातून पकडले दहशतवादी आणि वाढवली मुंबईची सुरक्षा ; हे आहे त्यामागचे कारण

त्यामुळे दुर्घटना होते आणि परिणामी जीव जातो. त्यामुळे पर्यटकांनी आततायीपणा करु नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येतं. मात्र पोलिसांकडे दुर्लक्ष करुन अनेक तरुण हुल्लडबाजी करताना दिसतात.

lonavla
Pune : आमच्यावर आलेली वेळ कुणावरही येऊ नये, माळीणवासीयांची भावना; दुर्घटनेच्या नऊ वर्षांनंतरही वेदना कायम

लोणावळ्यात दरवर्षी अशी परिस्थिती बघायला मिळते. त्यामुळे लोणावळ्यातील प्रत्येक पर्यटनाच्या ठिकाणी स्पीकरवरुन खबरदारीच्या सूचना दिल्या जातात. शिवाय काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील असतो.

lonavla
Homemade Face Scrubs : साखर किंवा कॉफी नव्हे तर या 4 गोष्टींपासून तयार करा स्क्रब, चेहऱ्याची त्वचा होईल नितळ व स्वच्छ

पोलिसांकडून काय आवाहन केल जात आहे?

-पर्यटकांनी जीवावर बेतेल असं कृत्य करु नये.

-पर्यटनाच्या ठिकाणी मद्यपान करु नये.

-पर्यटकांनी आपली वाहनं नो-पार्किंगमध्ये किंवा रस्त्यावर लावू नये.

-लोणावळ्यात मोठे धबधबे आहेत. त्या धबधब्याच्या खाली वर्षाविहाराचा आनंद घ्यावा. धबधब्याच्या वरच्या बाजूने चढू नये.

- फोटो किंवा व्हिडीओ काढताना काळजी घ्यावी.

-काही धबधब्यांची उंची मोठी आहे. त्यामुळे व्हिडीओ काढण्यााठी तरुण आततायीपणा करतात. या तरुणांवर योग्य कारवाई केली जाईल.

-मद्यपान करुन रस्त्यांवर धिंगाणा घालू नये.

-पर्यटक असलेल्या महिलांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com