कल्याण-शिळफाटा मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा! प्रशासनाच्या दुर्लक्षाने नागरिकांचे हाल

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 22 June 2020

पनवेल-दिवा रेल्वेमार्गावरील जुन्या निळजे रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्याच्या बाजूच्या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू केल्याने आज सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या. या वेळी कोंडी झाल्याने कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.

कल्याण : पनवेल-दिवा रेल्वेमार्गावरील जुन्या निळजे रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्याच्या बाजूच्या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू केल्याने आज सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या. या वेळी कोंडी झाल्याने कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.

आरे वसाहतीत मेट्रो कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा

कल्याण पूर्व कोळशेवाडी वाहतूक पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पनवेल-दिवा रेल्वेमार्गावरील जुन्या निळजे रेल्वे उड्डाणपुलाची रेल्वे विभागाने आयआयटीमार्फत सुरक्षा तपासणी केली असता, आयआयटीने पूल असुरक्षित असून, वाहतूक तत्काळ बंद करण्याचा अहवाल दिल्याने रेल्वेने वाहतूक विभागाला कळविल्याने मंगळवारी पहाटेपासून त्या उड्डाणपुलावरील वाहनास वाहतूक बंद केली असून, त्या पुलाच्या बाजूला असलेल्या पुलावरून वाहतूक वळविण्यात आल्याने आज सकाळी सात वाजल्यापासून निळजे पुलापासून एक ते दोन किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालकांसहित कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.

गेले दीड तास गाडीत बसून आहे. गाडी हळूहळू पुढे सरकत असून, नाहक त्रास सहन करावा लागत आहे. किती वेळ लागेल त्याचा नेम नाही.
- निखिल टोकेकर, नागरिक

पूल वाहतुकीला बंद केल्याने कल्याण-शिळफाटा रोडवर वाहतूक कोंडी होणार असून, एक ते दोन तास वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करावा. कल्याण पूर्व, पश्चिम आणि उल्हासनगरमधील वाहनचालक नवी मुंबईकडे जाणार असाल तर हाजी मलंग रोड व्हाया तळोजा एमआयडीसीमार्गे पुढे जावे; तर डोंबिवलीमधील वाहनचालकांनी दिवा रोड मार्गे शिळफाटा जाऊन पुढे जावे. रस्ते खराब असतील, मात्र या कोंडीत अडकून बसण्यापेक्षा पर्यायी मार्गाचा वापर करा.
- सुरेंद्र शिरसाठ, 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कल्याण पूर्व


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Long queues of vehicles on Kalyan-Shilphata road! The plight of the citizens due to the negligence of the administration