म्हसा यात्रेत खाद्य पदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाना करडी नजर

नंदकिशोर मलबारी
बुधवार, 9 जानेवारी 2019

सरळगांव - 21 जानेवारी रोजी 200 वर्षाची परंपरा असलेल्या व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या म्हसा यात्रेला सुरवात होणार असल्याने या यात्रेत विकल्या जाणा-या मिठाई व खाद्य पदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची मार्फत करडी नजर राहाणार असल्याची माहीती मुरबाड तहसिलदार सचिन चौधर यांनी काढलेल्या प्रेस नोटमध्ये नमूद केले आहे.

सरळगांव - 21 जानेवारी रोजी 200 वर्षाची परंपरा असलेल्या व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या म्हसा यात्रेला सुरवात होणार असल्याने या यात्रेत विकल्या जाणा-या मिठाई व खाद्य पदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची मार्फत करडी नजर राहाणार असल्याची माहीती मुरबाड तहसिलदार सचिन चौधर यांनी काढलेल्या प्रेस नोटमध्ये नमूद केले आहे.

महाराष्ट्रात सर्वात मोठी यात्रा म्हणून म्हसा यात्रेकडे पाहिले जाते. या यात्रेच्या वेळी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून नियोजन करण्यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत साठी सर्व प्रशासकीय विभागाचे प्रमूख अधिकारी उपस्थीत होते. या यात्रेत येणारा भाविक श्रध्देने येत असल्याने या ठिकाणी येणा-या भाविकांची कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही पाहीजे असी सक्त ताकित उपस्थीत अधिका-यांना दिली. या यात्रेत येणा-या  भाविकांवर नजर ठेवण्यासाठी सी सी टीव्ही कॅमे-या मार्फत नजर ठेवली जाणार आहे. 

या यात्रेत येणा-या व जाणा-या यात्रकरूंना प्रवासाची अडचण होऊ नये या साठी मुरबाड, कर्जत, कल्याण आदि ठिकाणाहून एसटी मार्फत प्रवासी वाहातूकिची व्यवस्था करण्यात आली आहे. या यात्रेत येणा-या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी म्हसा ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या आहेत. या यात्रेत आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आरोग्य विभागा मार्फत पथके तयार करण्यात आली आहेत. आगी सारखी परीस्थिती निर्माण झाल्यास तातडीची उपाय योजना करता यावी यासाठी आगनिशामकच्या गाड्या तैनात करण्यात येणार आहेत. या यात्रेत मद्दप्राशन करून कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी गावठी दारू अगर ईतर अवैध व्यवसायावर स्थानिक पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागा मार्फत लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच या यात्रेचा फायदा घेऊन प्रवाशांना लुटणा-या चोरट्या प्रवाशी वाहातूकिला आळा घालण्यासाठी आरटीयो मार्फत कडक कारवायीची उपाय योजना राबविण्यात येणार आहे. तसेच पार्किगच्या नावा खाली अनाधिकृत पार्किंग केंद्रावर कठोर कारवायी करण्याचे आदेशही स्थानिक पोलिस विभागाला दिली आहे. 

Web Title: Look at Food and Drug Administration on food items in Mhasa Yatra