अखेर लोअर परळ पुलाच्या पश्चिम दिशेकडील भागाचे काम पूर्ण

कुलदिप घायवट
Tuesday, 12 January 2021

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ रेल्वे स्थानकावरील डिलाइल उन्नत पुलाचे काम पश्चिम रेल्वे आणि महापालिका यांच्याद्वारे करण्यात येत आहे.

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ रेल्वे स्थानकावरील डिलाइल उन्नत पुलाचे काम पश्चिम रेल्वे आणि महापालिका यांच्याद्वारे करण्यात येत आहे. नुकताच पश्चिम रेल्वेने पुलाच्या पश्चिम दिशेकडील काम पूर्ण केले आहे. त्यामुळे लवकरच डिलाईड पूल प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. 

प्रभादेवी आाणि अंधेरी येथील गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर आयआयटी मुंबई, महापालिका अधिकारी आणि रेल्वे प्रशासनाने 455 पुलांचे सुरक्षा ऑडिट केले होते. त्यामध्ये लोअर परळचा पूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार जुलै 2018 मध्ये पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करुन पाडण्यात आला. त्यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये मेगाब्लॉक घेऊन या पुलाचे पाडकाम करण्यात आले. पश्चिम रेल्वेने जुलै 2020 मध्ये या पुलाच्या पूर्वेकडील पाया रचण्याचे काम पूर्ण केले. लॉकडाऊन कालावधीचा उपयोग करून फिजिकल डिस्टन्सिंग आणि सर्व नियमांचे पालन करून पुलाचे काम केले. तर, पश्चिम बाजूकडील पाया भरण्याचे काम हवामानाचा अंदाज घेऊन करत होते. त्यानंतर नुकताच पश्चिमेकडील बाजूचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. 

मुंबई विभागातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोना, लॉकडाऊन, मान्सूनच्या कठीण काळात पुलाचे काम केले जात होते. फिजिकल डिस्टन्सिंग आणि सर्व नियमांची अंमलबजावणी करून पश्चिम रेल्वेने काम पूर्ण केले. पुलाच्या पश्चिम दिशेकडील कामासाठी स्टेनलेस स्टीलच्या एकुण 360 एमटीचा उपयोग करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत गर्डरच्या कामासाठी 260 एमटी स्टेनलेस स्टील बांध कामाच्या ठिकाणी पोहचविण्यात आले आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. 
 

  • पश्चिम रेल्वेने पुलाच्या कामासाठी 87 काेटी रुपयांचे कंत्राट दिले आहे.  
  • या पुलाची लांबी 85 मीटर आणि रुंदी 37 मीटर असणार आहे.- वाहतुकीसाठी 26.7 मीटरचा रस्ता असणार आहे.
  • 2 मीटरचा फुटपाथ असणार आहे.
  • पुलाकरिता महापालिकेने रेल्वेला 125 कोटी रुपये दिले आहेत.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Lower Parel Bridge west side Work completed


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lower Parel Bridge west side Work completed