
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव साप्ताहिक एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करून वारंवारतेत वाढविण्याचा निर्णय घेतला.
एलटीटी-मडगाव साप्ताहिक एक्सप्रेस वेळेत बदल
मुंबई - प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव साप्ताहिक एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करून वारंवारतेत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एलटीटी-मडगाव साप्ताहिक एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 11099 एलटीटी-मडगाव साप्ताहिक एक्सप्रेस 4 नोव्हेंबर 2022 पासून दर मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्य रात्री १२.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी सकाळी 11.30 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 11100 ही गाडी 4 नोव्हेंबर 2022 पासून दर मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मडगाव येथून दुपारी 12.45 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी रात्री ११.२५ वाजता पोहोचेल. या दोन्ही गाडया ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी स्थानकांत थाबणार आहे. तसेच एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, 1 द्वितीय वातानुकूलित, 8 तृतीय वातानुकूलित, 6 शयनयान, 3 सामान्य द्वितीय श्रेणी, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन, एक जनरेटर व्हॅन आणि एक पॅन्ट्री कोच अशी एलटीटी-मडगाव साप्ताहिक एक्सप्रेस गाडीची सरंचना आहे.